Ahmednagar Video : गुरुजी तुम्ही सुद्धा? नगरला सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत तुफान राडा, मास्तरांची हमरी तुमरी
सहकारी सोसायटीची वार्षिक सभा (Annual meeting of a cooperative society) आयोजित करण्यात आली होती. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यावरून एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले.
अहमदनगर : अहमदनगरमध्ये माध्यमिक शिक्षकांच्या (Secondary teachers) सभेत प्रचंड गोंधळ झाला आहे. इतरांना आदर्श देणारे गुरुजीच एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. धक्काबुक्की करण्यात आली. त्याचबरोबर ध्वनिक्षेपकाची मोडतोडही यावेळी करण्यात आली. सहकारी सोसायटीची वार्षिक सभा (Annual meeting of a cooperative society) आयोजित करण्यात आली होती. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यावरून एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. गोंधळ करत आरडाओरडा करत एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, हमरीतुमरी-धक्काबुक्की करणे, ध्वनिक्षेपकाची (Loudspeaker) मोडतोड असे वातावरण पाहायला मिळाले. सत्ताधाऱ्यांनी अखेर विषयांचे वाचन न करताच सभा गुंडाळली. . सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचा प्रचंड विरोध करताना पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांनाही बोलावण्यात आले. त्यांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
#Ahmednagar : नगरला सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत तुफान राडा झाला. यावेळी मास्तर हमरी तुमरीवर आले होते. पाहा Video – #Teachers #ruckus #Politics अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/2VR6onC8YL
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 9, 2022
कोरोनामुळे दोन वर्षे सभा झाली होती ऑनलाइन
सत्ताधारी मंडळाचे नेते भाऊसाहेब कचरे आणि विरोधी संचालक बाबासाहेब बोडखे, अप्पासाहेब शिंदे यांच्याशी सोसायटीतील विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा अनेकदा रंगला. सोसायटीची 79वी वार्षिक सभा, संस्थेचे अध्यक्ष सुरेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोरोनामुळे दोन वर्षे सभा ऑनलाइन पद्धतीने झाली होती. काल मात्र प्रत्यक्ष झाली. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर तुटून पडले होते. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते. सभासद शिक्षकांची उपस्थिती कमी असली तरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. सभेत पोलीस बंदोबस्तही मागवण्यात आला होता.
काही सभासद मद्यपान करून आले?
या सभेत भाडेतत्त्वावर डाटा सेंटरची उभारणी, जागा खरेदी, नोकर भरती, मयत निधी, संस्थेचा कारभार ऑनलाइन झाला की नाही, मागील इतिवृत्तात सभासदांनी मांडलेल्या मुद्यांचा समावेश नसणे, सभा कायदेशीर की बेकायदेशीर असे अनेक विषय गाजले. काही सभासद सभेत मद्यपान करून आल्याचा संशय व्यक्त केला जात होता. डाटा सेंटर त्रयस्थ संस्थेच्या मदतीने भाडेतत्त्वावर उभारणीस बाबासाहेब बोडखे यांनी विरोध नोंदवला. सभासद सुनील दानवे, सुनील पंडित, मारुती भालेराव, आत्माराम दहिफळे, देविदास पालवे, संजय फटांगरे, सुनील वाळुंज, भाऊसाहेब काळे, किशोर मुथा आदी चर्चेत सहभागी झाले होते.