लातूर : विदर्भापाठोपाठ (Marathwada) मराठवाड्यातही उन्हाच्या झळा ह्या वाढत आहे. गेल्या आठ दिवसांपासून तर जिल्ह्याचा पारा 40 शी पार गेला आहे. अशाच रखरखत्या (Temperature) उन्हामध्ये निलंगा-औसा मार्गावरील वाघोली पाटीजवळ भर दुपारीच धावत्या (Car Burning) कारने पेट घेतल्याची घटना घडली. अचानक झालेल्या या प्रकरामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, या कारमधून तिघेजण प्रवास करीत होते. मात्र, कारला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात येताच गाडी थांबवून तिघेही बाहेर पडले. इंजिनच्या आजू-बाजूला असलेल्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या घटनेत प्रसंगवधान दाखविल्याने कोणीही जखमी झाले नाही.
निलंगा-लातूर मार्गावर धावती कार जेव्हा पेट घेते… pic.twitter.com/pb7o2uigon
हे सुद्धा वाचा— TV9 Marathi Live (@tv9_live) May 9, 2022
रविवारी भर दुपारी मारुतीची स्विफ्ट डिझायर या चारचाकीतून तिघेजण हे निलंग्याहून लातूरकडे निघाले होते. दरम्यान, कार ही वाघोली पाटीजवळ येताच अचानक पेट घेतला. वाढते ऊन आणि इंजिन जवळील शॉर्टसर्किटमुळेच हे झाल्याचा अंदाज आहे. मात्र, गाडीच्या इंजिनने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी बाजूला घेतली आणि गाडीतील तिघेही बाहेर आले. यामध्ये सर्वजण सुखरुप असले तरी गाडीचे मात्र, मोठे नुकसान झाले आहे. शिवाय गाडीमध्ये अग्निशमनाचे कसलेही साहित्य नसल्याने कारला लागलेली आग विझवण्यात यश आले नाही .
इंजिनच्या आजू-बाजूला असलेल्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग पसरली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. असे असले तरी वाढत्या उन्हामुळे तर ही घटना घडली नाही अशी शंका उपस्थित होत आहे. कारण गेल्या 8 दिवसांपासून उन्हाच्या झळा ह्या वाढत आहेत. शिवाय भर दुपारीच ही कार लातूरकडे मार्गस्थ होत असताना रखरखत्या उन्हामध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे शॉर्टसर्किट की आणखीन काही हा सवाल कायम आहे.