भाजपच्या बड्या नेत्यानं आदित्य ठाकरेंना काय सल्ला दिला ?

भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर बोलणं टाळत आदित्य यांना मात्र सल्ला दिला आहे.

भाजपच्या बड्या नेत्यानं आदित्य ठाकरेंना काय सल्ला दिला ?
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 7:36 PM

गोंदिया : माजी मंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांना भाजपचे नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक खास सल्ला दिला आहे. आदित्य ठाकरे हे तरुण नेते असून राजकारणात नवीन आहे, त्यांना खूप काही शिकायचे आहे. त्यांनी कुणावर जास्त बोललं नाही पाहिजे असे म्हणत विखे पाटील यांनी आदित्य यांना वाडीलकीचा सल्ला आहे. विखे पाटलांचा वडीलकिचा सल्ला हा भाजपसह शिंदे गटावर करत असलेल्या टीकेवरून विखे पाटील यांनी हे विधान केले आहे. गोंदिया येथे माध्यमांशी बोलत असतांना त्यांनी हे विधान केले आहे. आदित्य ठाकरे हे ठाकरे गटाची बाजू मांडण्यात पहिल्या फळीतील नेते असून विरोधकांवर तुटून पडत राज्यभर रान पेटवत आहे. त्यामुळे आदित्य यांच्याकडून विरोधकांवर वेळोवेळी शाब्दिक हल्लाबोल करत धारेवर धरत आहे.

भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर बोलणं टाळत आदित्य यांना मात्र सल्ला दिला आहे.

आदित्य ठाकरे हे तरुण नेते आहेत, राजकारणात नवीन आहे. त्यांना खूप काही शिकायचे आहे, त्यांनी जास्त टीका केली नाही पाहिजे असंही मत विखे यांनी मांडले आहे.

आदित्य ठाकरे यांना सल्ला देत असतांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मात्र आदित्य यांच्यावर कुठलीही टीका केली नाही.

नुकताच आदित्य ठाकरे यांनी राज्यातून गुजरात मध्ये गेलेल्या प्रकल्पावरून भाजपसह शिंदे गटाला टार्गेट करत अनेक सवाल उपस्थित केले आहे.

याशिवाय विखे पाटील यांनी आदित्य यांना लवकर सत्ता बघायला मिळाली आणि ती तितक्याच वेगाने निघूनही गेली असं म्हणत कोपरखळी लगावली आहे.

विखे पाटील यांनी दिलेला सल्ला आदित्य ठाकरे यांच्या महत्वाचा आहे का ? आदित्य ठाकरे विखे पाटील यांचा सल्ला ऐकतील का ? हे पाहणं देखील महत्वाचे आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.