Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात, खाजगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, नेमकं काय घडलं

पाथरेजवळ झालेल्या ट्रक आणि खाजगी बसमधील अपघातातील जखमींना शिर्डी, नाशिक आणि नगरच्या दिशेने मिळेल त्या वाहनाने पाठविण्यात आले आहे.

सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात, खाजगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, नेमकं काय घडलं
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 8:42 AM

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ते शिर्डी महामार्गावर पाथरेजवळ भीषण अपघात झाला आहे. पहाटेच्या दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. यामध्ये खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. यामध्ये बसमधील प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती प्राथमिक माहिती आहे. खरंतर अपघाताच्या नंतर दृश्य पाहिल्यानंतर बसचा चक्काचूर झाला आहे. ट्रक आणि आराम बसची धडक झाल्यानंतर बसची एकबाजू पूर्णतः चक्काचूर झाली आहे. मोठ्या प्रमाणात बसचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे नागरिक गंभीर जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. त्यामुळे मदतकार्य करणाऱ्या स्थानिकांच्या माहितीनुसार यामध्ये मृत्यू होण्याची शक्यता आहे.

पाथरेजवळ झालेल्या ट्रक आणि खाजगी बसमधील अपघातातील जखमींना शिर्डी आणि नगरच्या दिशेने मिळेल त्या वाहनाने पाठविण्यात आले आहे.

अपघात घडल्यानंतर झालेल्या आवाजाने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी धाव घेतली, अपघात इतका भीषण होता की नागरिकांच्या ओरडण्याने परिसरातील गावकरी मदतीसाठी एकवटले होते.

हे सुद्धा वाचा

ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून जखमी प्रवाशांना बाहेर काढले, रुग्णवाहिका आणि पोलिसांना याबाबत नागरिकांनी माहिती कळवली होती.

तो पर्यन्त सुरक्षित असलेल्या प्रवाशांनी आणि ग्रामस्थांनी जे जखमी झाले आहे त्यांना बाहेर काढून येणाऱ्या जणाऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी रवाना केले आहे.

जखमी मध्ये मृत्यूची भीतीही व्यक्त केली जात आहे. यामध्ये काहींना शिर्डी तर काहींना नाशिकच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

सिन्नर तालुक्यातील वावी पोलीसांनी याबाबत मदत कार्य केले असून अधिकचा तपास केला जात आहे, त्यामध्ये सिन्नरच्या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.