अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली नाही, शिवरायांचे राज्य भोसल्यांचे नव्हे तर ते रयतेचे हिंदवी स्वराज्य, शरद पवारांचे प्रतिपादन

अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली असू शकत नाही. शिवरायांचे राज्य भोसल्यांचे नव्हे, तर ते रयतेचे हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले.

अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली नाही, शिवरायांचे राज्य भोसल्यांचे नव्हे तर ते रयतेचे हिंदवी स्वराज्य, शरद पवारांचे प्रतिपादन
सोनोशी गावात (ता. इगतपुरी) क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मरणार्थ आयोजित सन्मान बाडगीच्या माचीच्या कार्यक्रमाला शरद पवार, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ उपस्थित होते.
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 4:51 PM

नाशिकः अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली असू शकत नाही. शिवरायांचे राज्य भोसल्यांचे नव्हे, तर ते रयतेचे हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले.

पवार इगतपुरी तालुक्यातील सोनोशी गावात क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मरणार्थ आयोजित सन्मान बाडगीच्या माचीचा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, पिढ्यान पिढ्या या देशाचा मूळ मालक असलेल्यांची अवस्था वाईट आहे. त्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. राघोजी भांगरे यांचे स्मरक आपण उभारतो आहोत. आदिवासी समाजाची तरुण पिढी इथे आली याचा आनंद आहे. आदिवासींसाठी संघर्ष करावा लागेल. खरे तर अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली असू शकत नाही. पुढच्या आठवड्यात नक्षली भागात मी स्वतः जाणार आहे. तिथल्या तरुणांशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बिरसा यांचा वारसा जपा

पवार पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या राज्याला भोसल्यांचे राज्य असे कुणी केले नाही. ते रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्याचे राज्य असे म्हटले जाते. भीमा कोरेगावला ऐतिहासिक घटना घडली, पण त्याचा देशात वाद झाला. पण तिथे लढणारा व्यक्ती आदिवासी होता. बिरसा यांचा वारसा जपला पाहिजे. आदिवासी संस्कृती जपली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आदिवासींच्या जमिनी बळकावल्या

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, वनवासी आश्रमच्या निमित्ताने चांगले काम चालू आहे, असे चित्र केले जात आहे. मात्र, आदिवासी या देशाचे मूळ मालक आहेत. त्या आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न होतो आहे. मुंबईत कंटाळलेले लोक इथे जमिनी घेऊन अधिवासींना कामाला ठेवताहेत. आरक्षण काढण्यासाठीच काही लोक तुम्हाला वनवासी म्हणत आहेत, असा दावा त्यांनी केली.

2014 नंतर पेट्रोल महाग

कार्यक्रमात पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, पवार साहेबांनी नेहमी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न केले. आजूबाजूची जागा डिफेन्ससाठी संपादित करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी पवार साहेबांनी आदिवासींच्या पाठीशी उभे राहून मदत केली. काही लोक म्हणतात 1947 ला मिळालेले स्वतंत्र म्हणजे भीक आहे. 2014 नंतर काय मिळाले. पेट्रोल महाग, गॅस महाग. ज्यांना देशाचा इतिहास माहित नाही त्यांना पुरस्कार दिला, असा टोलाही त्यांनी हाणला. (A tribal who fights against injustice is not a Naxalite, Shivaji Maharaj’s kingdom was the Hindavi Swarajya of the ryots, asserted Sharad Pawar)

इतर बातम्याः

देशभरातील बुद्ध विहारांचे संघटन सुरू; नाशिकमध्ये पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात विविध ठराव संमत

मतदार यादीमधील नाव नोंदणी, दुरूस्तीसाठी नाशिक जिल्ह्यात विशेष शिबिर अन् ग्रामसभेचे आयोजन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.