भारतीय रेल्वेवरील एक अनोखे रेल्वे स्टेशन, जशी ‘एक दील दो जान’ जुळी भावंडंच
भारतीय रेल्वेवर अशी भन्नाट नावांची स्थानके आहेत, तशी त्यांची भौगोलिक रचनाही सुंदर आहे. आता भारतीय रेल्वेवरील एक रेल्वे स्थानक त्यांच्या भौगोलिक रचनेमुळे जाम फेमस आहे.
मुंबई : भारतीय रेल्वे जगातील चौथे सगळ्यात मोठे नेटवर्क ( NETWORK ) असलेली संस्था आहे. भारतीय रेल्वेवर (INDIAN RAILWAY ) दररोज दोन कोटी प्रवासी दररोज प्रवास ( PASSENGER ) करीत असतात. रेल्वेच्या अनेक स्थानकांची नावे तर मजेदार असतातच शिवाय त्यांच्या भौगोलिक रचनांमुळे ही स्थानके जगात अलौकीक वेगळी ठरतात. आज आपण अशाच एका आगळ्या – वेगळ्या स्थानकाची माहीती घेणार आहोत. आपला भाऊ म्हटल्या जाणाऱ्या या राज्यात एक आश्चर्यकारक रेल्वे स्थानक आहे. नावाला ते आपल्या राज्यात असेल तरी कागदावर म्हणजे नकाशावर त्याचे स्थान पाहून तुम्ही आश्चर्याने तोंडात बोट घालाल.
म्हणायला आपल्या राज्यात पण परराज्याला लागूनच एक वेगळे वैशिष्ट्यपूर्ण रेल्वे स्थानक आहे ज्याच्या नावापेक्षा त्याच्या भौगोलिक स्थानामुळे ते कायम चर्चेत असते. या स्थानकाची ओळख आज आपण करू देणार आहोत. एकेकाळी मुंबई इलाखाचे राज्यात मुंबईला खेटूनच एक राज्य होते. जे आज त्याच्या वेगाने होत असलेल्या प्रगतीने बातम्यांच्या जगात नेहमीच चर्चेत असते, ते राज्य कोणते आहे, ते तुम्ही ओळखलेच असाल. महाराष्ट्राच्या नंदूरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्याचे ठिकाण आहे. हेच नवापूर रेल्वे स्टेशन एकदमच भारी आहे, कारण त्याचे भौगोलिक स्थान असे आहे की तेथील एका बेंचवर तुम्ही तुमच्या सहकाऱ्याबरोबर बसला आणि त्याने काही गुन्हा केला तर शेजारच्या राज्यात गुन्हा दाखल होऊन शकतो !
भारतीय रेल्वेवरील हे अनोखे स्थानक पश्चिम रेल्वेच्या हद्दीत आहे, त्याचे नाव नवापूर असे आहे. या रेल्वे स्थानकाबद्दल सगळ्यानाच अप्रुप असते. तत्कालिन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी देखील या स्थानकांबद्दल ट्वीटवर माहीती शेअर केली होती. या रेल्वे स्थानकाची लांबी 800 मीटर आहे. आणि त्यातील 500 मीटर बाजू गुजरातला मिळाली आहे. तर 300 मीटरची बाजू आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे एका रेल्वे स्थानका दोन राज्याचा समावेश झाला आहे. नवापूर रेल्वे स्थानकाचे तिकीट काऊंटर आणि पोलीस चौकी महाराष्ट्राच्या हद्दीत आहे तर स्टेशन मास्तर कार्यालय, वेंटीग रूम आणि वॉशरूम गुजराज राज्यातील तापी जिल्ह्यात आहेत. आणि येथे गुन्हा दाखल करताना पोलिसांमध्ये चांगलेच सीमेचे वाद होतात, गुजरातमध्ये दारूबंदी आहे तर महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी आहे की नाही कमाल, शिवाय या स्थानकावर एका बेंचवर दोन राज्यांचा कायदा चालतो, तेव्हा नेस्क्ट टाईम तुम्ही नवापूरला जाल तर या अनोख्या बाकड्यावर सेल्फी नक्कीच काढा ! आता या गुजरात राज्याला जोडणारी बुलेट ट्रेनही वेगाने पूर्ण होत आहे.