नाशिक हादरलं! वॉर्डबॉयकडून महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, हल्ला करण्यामागील कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल
नाशिकच्या गंगापूर रोडवरील निम्स हॉस्पिटलच्या एका वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर हल्ला केल्याची घटना संपूर्ण शहरात पसरली असून कारवाईची मागणी होत आहे.
नाशिक : नाशिक शहरात महिला डॉक्टरवर हल्ला होण्याची दुसरी घटना समोर आली आहे. नाशिकमधील डॉ. प्राची पवार यांच्या हल्ल्याची घटना ताजी असतांनाच रुग्णालयातच एका महिला डॉक्टरवर वॉर्डबॉयने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये डॉक्टरने मैत्रिणीला रागावलं म्हणून वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर हल्ला केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दवाखान्यातील कात्रीने शरीरावर वार केले असून असून घटनेत महिला डॉक्टर गंभीर जखमी झाली आहे, नाशिकच्या गंगापूर रोडवरील निम्स रुग्णालयात रविवारी रात्री ही घटना घडली होती. यावरून गंगापूर पोलीसांनी वॉर्डबॉय अनिकेत डोंगरेला अटक केली असून गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरातील महिला डॉक्टरवर हल्ला होण्याची दुसरी घटना असल्याने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. वॉर्डबॉयची मैत्रीण ही याच रुग्णालयात नर्स असून तिच्यावर महिला डॉक्टर रागविल्याने हा हल्ला झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
नाशिक शहरात काही दिवसांपूर्वी डॉ. प्राची पवार यांच्यावर फार्महाऊसमधून बाहेर पडत असतांना धारधार हत्याराने वार करण्यात आले होते. त्यामध्ये पवार या गंभीर जखमी झाल्या होत्या.
ह्या घटनेचा उलगडा होऊन कारवाई होत नाही तोच महिला डॉक्टरवर हल्ला झाल्याची दुसरी घटना समोर आली आहे. यामध्ये महिला डॉक्टर जखमी झाल्या आहे.
नाशिकच्या गंगापूर रोडवरील निम्स हॉस्पिटलच्या एका वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर हल्ला केल्याची घटना संपूर्ण शहरात पसरली असून कारवाईची मागणी होत आहे.
मैत्रिणीला डॉक्टर रागावतात म्हणून वार्डबॉयकडून चाकूने हल्ला, डॉक्टरवर हल्ला होण्याची नाशिकमधील दुसरी घटना #nashiknews #nashikcrime #docterattak #cctv #nashikpolice pic.twitter.com/jDBj34RTij
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) December 28, 2022
वॉर्डबॉयने दवाखान्यातील कात्रीनेच डॉक्टरच्या शरीरावर वार केल्याने महिला डॉक्टर गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
डॉक्टरांवरील हल्ले यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले असून शहर पोलीसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर संघटना करीत आहे.
निम्स हॉस्पिटलच्या घटनेतील संशयित आरोपीला गंगापूर पोलीसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.