Aurangabad : नदीत उलटली बैलगाडी, दोन मुलींसह एका महिलेचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्घटना

सध्या शेतीकामाची लगबग सुरु आहे. त्याचप्रमाणे कन्नड तालुक्यातील आडगाव जेहूर शिवारात कापूस लागवडीचे काम सुरु होते. मात्र, दुपारी अचानक तालुक्याात पावसाला सुरवात झाली होती. पावसाने कापूस लागवडीचा खोळंबा झाल्याने बैलगाडीतून 8 मजुर हे गावाकडे परतत असतााना ही दुर्घटना घडली. नदीवरील पाण्याचा अंदाज न आल्याने गाडीवानाने गाडी पाण्यात घातली पण वेग अधिक असल्याने बैलगाडी ही उलटली.

Aurangabad : नदीत उलटली बैलगाडी, दोन मुलींसह एका महिलेचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्घटना
मराठवाड्यात पावसाला सुरवात झाली आहे.
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 10:16 AM

औरंगाबाद : आता कुठे (Marathwada) मराठावाड्यात पावसाला सुरवात झाली आहे. पण हा (Rain) पाऊस देखील नुकसानीचा ठरत आहे. कन्नड तालुक्यातील जातेगाव परिसरात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. नदीला आलेल्या पुरात दोन मुलींसह एका महिलेचा वाहून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतीकामे उरकून बैलगाडीतून गावाकडे परतत असताना आडगावच्यालगत असलेल्या ओढ्याला आलेल्या पुरात (Bullock cart) बैलगाडीच उलटली यामध्ये ही दुर्घटना घडली. पाण्याला प्रचंड वेग असल्याने साक्षी अनिल सोनवणे (वय 16), पूजा दिनकर सोनवणे (12) व मीनाबाई दिनकर बहीरव (50)या तिघी वाहून गेल्या तर उर्वरित मजुरांनी कसाबसा आपला जीव वाचवला.

नेमकी कशी घडली घटना?

सध्या शेतीकामाची लगबग सुरु आहे. त्याचप्रमाणे कन्नड तालुक्यातील आडगाव जेहूर शिवारात कापूस लागवडीचे काम सुरु होते. मात्र, दुपारी अचानक तालुक्याात पावसाला सुरवात झाली होती. पावसाने कापूस लागवडीचा खोळंबा झाल्याने बैलगाडीतून 8 मजुर हे गावाकडे परतत असतााना ही दुर्घटना घडली. नदीवरील पाण्याचा अंदाज न आल्याने गाडीवानाने गाडी पाण्यात घातली पण वेग अधिक असल्याने बैलगाडी ही उलटली. यामध्ये दोन मुली व एक महिला ही वाहून गेली तर इतरांनी आपला जीव कसाबसा वाचवला.

दोघींचे मृतदेह हाती, पूजचा शोध सुरु

घटनेनंतर दोन मुलींचा व महिलेचा शोध सुरु झाला. नदीपासून 1 किमी अंतरावर मीना बहिरव आणि साक्षी सोनवणे या दोघींचा मृतदेह सापडला पण पूजा सोनवणेचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता. बैलगाडी हाकणारा गाडीवान देखील यामध्ये गंभीर जखमी असून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात त्यावर उपचार सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार

मान्सून राज्यात दाखल होऊन महिना उलटला तरी मराठवाडा मात्र कोरड़ाच होता. आता कुठे चित्र बदलत आहे. मात्र, कन्नड तालुक्यात अचानक ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार घातला. सबंध शेतशिवारात पाणी तर साचलेच पण लहान-मोठे नदी नाले अवघ्या काही वेळेत वाहू लागले होते. हा पाऊस नसून काहीतरी विघ्न घेऊन आल्याच्या भावना शेतकऱ्यांच्या होत्या. अचानाक झालेला पाऊस तिघांच्या जीवावर बेतला हे मात्र नक्की.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.