Nalasopara: नालासोपाऱ्यात थरार! पाचव्या मजल्यावरुन पडली चौथ्या मजल्यावर अडकली; शेवटी ग्रील तोडून तिला वाचवले
चौथ्या पडल्यावर अडकल्यावर या तरुणीने मदतीसाठी आरडा-ओरडा केला. यानंतर तिचा हात सुटू नये म्हणून चौथ्या मजल्यावरुन सोसायटीतील सदस्यांनी तिला पकडून ठेवलं होतं. यानंतर अग्निशमन दलाला बोलावलं. वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी सायंकाळी पाच वाजता पोहचून अवघ्या दहा मिनिटात तिला रेस्क्यू केलं.
नालासोपारा : मुंबईतील(Mumbai) मालाड(Malad) परिसरात एका सुरक्षा रक्षकाने घरकाम करणाऱ्या महिलेला 20 व्या मजल्यावरुन फेकले. मात्र, या घटनेत ही महिला आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. अशीच एक घटना नालासोपारा(Nalasopara) येथेही घडली आहे. पाचव्या मजल्यावरुन एक तरुणी पडली. ही तरुणी चौथ्या मजल्यावर अडकली. यानंतर चौथ्या मजल्यावरील लोकांनी या तरुणीला वाचवले. या दोन्ही दर्घटना अत्यंत भयानक होत्या. मात्र, या घटनेत दोघीही महिला जिवंत बचावल्या आहेत. नशीब बलवत्तर म्हणून या दोघीही वाचल्या आहेत.
चक्कर येवून पाचव्या मजल्यावरुन पडली
झाकिया खान (वय 21 वर्षे) असे या तरुणीचे नाव आहे. झाकिया नालासोपारा पश्चिमेकडील रिलायबल हाईटस् या सोसायटीतील पाचव्या मजल्यावर राहते. आज सायंकाळच्या सुमारास झाकिया चक्कर येवून खाली पडली होती. मात्र तिने चौथ्या मजल्यावरील ग्रीलला पकडल्यामुळे ती वाचली.
पाचव्या मजल्यावरुन पडली चौथ्या मजल्यावर अडकली
चौथ्या पडल्यावर अडकल्यावर या तरुणीने मदतीसाठी आरडा-ओरडा केला. यानंतर तिचा हात सुटू नये म्हणून चौथ्या मजल्यावरुन सोसायटीतील सदस्यांनी तिला पकडून ठेवलं होतं. यानंतर अग्निशमन दलाला बोलावलं. वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी सायंकाळी पाच वाजता पोहचून अवघ्या दहा मिनिटात तिला रेस्क्यू केलं.
ग्रील कटरच्या साहय्यानं तोडून अग्निशमन दलाने तरुणीला वाचवले
चौथ्या मजल्यावरील ग्रील कटरच्या साहय्यानं तोडून तिला आत घेत तिला वाचवण्यात यश मिळवलं आहे. शुक्रवारी वसईत एका साडे तीन वर्षाच्या मुलीचा सातव्या मजल्यावरुन पडून दुर्दैवा मृत्यू झाला होता. माञ आज अग्निशमन विभागानं मुलीला वाचवल्यानं वसई विरार मधून सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
घरकाम करणाऱ्या महिलेला 20 व्या मजल्यावरुन खाली फेकले तरीही ‘ती’ जिवंत वाचली
मालाड पश्चिम येथील सुंदर नगर परिसरातील ब्ल्यू होरायझन इमारतीमध्ये ही महिला घरकाम करण्यासाठी येत होती. येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीने या महिलेला विसाव्या मजल्यावरून खाली ढकलून दिले .मात्र, ही महिला 18 व्या मजल्यावरील छतावर पडली. सोसायटीच्या लोकांनी या महिलेला पाहिले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने या महिलेचे प्राण वाचवले. सध्या तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.