आधार कार्ड मतदान ओळखपत्राशी लिंक होणार; 1 ऑगस्ट पासून विशेष मोहीम

मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखली जावी, यासाठी  मतदारांच्या  मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड लुिंक केले जाणार आहे. 1 ऑगस्टपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.  मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी याबाबत महिती दिली.

आधार कार्ड मतदान ओळखपत्राशी लिंक होणार; 1 ऑगस्ट पासून विशेष मोहीम
आधार कार्ड, मतदार ओळखपत्रImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 6:48 PM

मुंबई : आता आधार कार्ड (Aadhaar card) मतदान ओळखपत्राशी(voter ID) देखील लिंक होणार आहे.  मतदारांची ओळख प्रस्थापित करून मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखली जावी, यासाठी  मतदारांच्या  मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड लुिंक केले जाणार आहे. 1 ऑगस्टपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.  मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी याबाबत महिती दिली.

या विशेष मोहिमेत मतदान ओळखपत्रासोबत आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी नमुना अर्ज क्र. 6ब तयार करण्यात आला आहे. हा अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. तसेच मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. त्याचबरोबर मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र 6ब व्दारे आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी निवतकर यांनी सांगितले.

मतदाराकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना क्र. 6ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना मनरेगा जॉब कार्ड, फोटोसहित किसान पासबुक, आरोग्य स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारा दिले गेलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, फोटोसहित पेन्शन कागदपत्रे, केंद्र / राज्य शासन कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, आमदार / खासदार यांना दिलेले ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र या ११ पर्यायापैंकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल.

मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक संलग्न करण्याच्या या विशेष मोहिमेत मुंबई शहर जिल्ह्यातील जास्तीजास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, असेही आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी निवतकर यांनी केले आहे.

पॅन कार्ड आधारशी लिंककरने बंधनकारक

भारतीय नागरीकांसाठी आधार कार्ड (Aadhar Card ) आणि पॅन कार्ड (PAN card) हे दोन दस्तऐवज महत्वाचे आहेत. कोणत्याही खासगी अथवा सरकारी कामात या दोन कागदपत्रांची आवश्यकता असते. सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासह अनेक सरकारी कामांमध्ये या कागपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे पॅन कार्ड आधारशी लिंककरने बंधनकारक करण्यात आले आहे.

असं करा Aadhar Card शी पॅन कार्ड लिंक

– सर्वप्रथम प्राप्तिकर कर विभाग अर्थात इन्कम टॅक्स विभागाच्या (Income Tax Department) वेबसाइटवर जा.

– आधार कार्डमध्ये दिल्याप्रमाणे नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाका.

– Aadhar Card मध्ये फक्त जन्माचं वर्ष दिलं असल्यास चौकोनावर टिक करा.

– आता कॅप्चा कोड टाका.

– आता ‘लिंक आधार’ या बटणावर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचं पॅन कार्ड (PAN card) आधारशी लिंक केलं जाईल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.