Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray: संघर्ष सुरू होता तेव्हाही आम्ही अयोध्येला जायचो, आता संघर्ष संपलाय; आदित्य ठाकरे यांचा मनसेला टोला

Aaditya Thackeray: आघाडी सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षातील लोक एकत्र आले आहेत. आम्ही लोकांची सेवा करत आहोत.

Aaditya Thackeray: संघर्ष सुरू होता तेव्हाही आम्ही अयोध्येला जायचो, आता संघर्ष संपलाय; आदित्य ठाकरे यांचा मनसेला टोला
आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यताImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 3:33 PM

नांदेड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या अयोध्या (ayodhya) दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला असतानाच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनीही राज यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या दौऱ्याला विरोध होत आहे, यावर काय सांगाल? असा सवाल आदित्य ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर, मी संपलेल्या विषयावर बोलत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. जेव्हा संघर्ष सुरू होता, तेव्हा आम्ही अयोध्येला जात होतो. आता संघर्ष संपलाय. आता आशीर्वाद घ्यायला जाणार असल्याचे अदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. नांदेडमध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी मंत्री उदय सांमत यांच्यासह स्थानिक खासदार .आमदारांची उपस्थिती होती. यावेळी मीडियाशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी ही बोचरी टीका केली.

आघाडी सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षातील लोक एकत्र आले आहेत. आम्ही लोकांची सेवा करत आहोत. कोव्हिडचं एवढं मोठं संकट आलं. पण आम्ही थांबलो नाही. रायगडाला आम्ही सहाशे कोटी रुपये दिले. शेतकऱ्याची कर्जमाफी केली. पण त्याची प्रसिद्धी झाली नाही. पुढच्या वेळेला उपजिल्हा रुग्णालयाचे काम करणाऱ्या मंडळींचा सत्कार करू. धर्म, हिंदू म्हणजे काय हे शिकण्याची आम्हाला गरज नाही. सेवा आमचा धर्म आहे. आपण खंबीरपणे आमच्या मागे रहा, नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमची कामे आवडतात की नाही आवडत असतील तर दोन्ही हातवर करा. नवा महाराष्ट्र घडवू, असं आवाहनही त्यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

10 जूनला अयोध्येला जाणार

राज ठाकरेंना अयोध्येत येण्यासाठी भाजपकडून प्रखर विरोध होत आहे. यावर मी बोलणार नाही. मात्र, महाविकास आघाडीने केलेल्या कामांसाठी आणि रामराज्यासाठी प्रभुरामचंद्राचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण 10 जूनला आयोध्येत जाणार असल्याचे वक्तव्य ठाकरे यांनी केलयं. यावेळी आदित्य यांनी राज यांच्या दौऱ्यावर भाष्य करणे टाळलं.

आम्ही विकासकामांचा भोंगा लावतो

आघाडीतील तिन्ही पक्ष क्रिकेट टीमसारखे एकत्रं आले आहेत. सर्व बेस्ट ऑफ आहेत, असं कौतुकही आदित्य यांनी केलं. तर, या कार्यक्रमात उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सांमत यांनी विकासकामांचा भोंगा आम्ही लावतो, राजकारणात नाही, अशा शब्दात मनसेवर टीका केली.

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.