Metro : मेट्रो तीनसाठी आरे कारशेडच योग्यच, उद्योगमंत्र्याच्या दाव्यानंतर पर्यावरण प्रेमींची भूमिका काय राहणार?

मेट्रो तीन साठी आरे येथील कारशेडच सर्वार्थाने व्यवहार्य असल्याचा तज्ज्ञांचा अहवाल आहे. मुंबईतील 17 लाख प्रवासी या मार्गिकेवर प्रवास करणार आहेत. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होणार तसेच याकरिता कोळसा जाळले जाणार नाही. यामुळे, दोन लाख मेट्रीक टन प्रदूषण कमी होणार आहे.  ही मेट्रो पर्यावरणपूरकच आहे.

Metro : मेट्रो तीनसाठी आरे कारशेडच योग्यच, उद्योगमंत्र्याच्या दाव्यानंतर पर्यावरण प्रेमींची भूमिका काय राहणार?
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 4:48 PM

मुंबई : घर बदलले की घराचेही वासेही बदलतात अगदी तोच अनुभव सध्याच्या (Maharashtra Politics) राज्याच्या राजकारणात पाहवयास मिळत आहे. कारण महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अधिकतर निर्णयाला (Eknath Shinde) शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. शिवाय मेट्रो तीनसाठी (Aarey Carshed)आरे कारशेडच योग्य असून येथूनच मार्ग असणार हे पूर्वीच स्पष्ट केले आहे. आता यावर उद्योगमंत्री उदय सामंत आरे येथील कारशेडच सर्वार्थाने व्यवहार्य असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे यावरुन पुन्हा राजकारण पेटणार का हे देखील पहावे लागणार आहे. शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधात मध्यंतरी पर्यावरण प्रेमी हे रस्त्यावर उतरले होते. आता काय होणार हे देखील पहावे लागणार आहे.

मेट्रो पर्यावरणपुरकच असणार

मेट्रो तीन साठी आरे येथील कारशेडच सर्वार्थाने व्यवहार्य असल्याचा तज्ज्ञांचा अहवाल आहे. मुंबईतील 17 लाख प्रवासी या मार्गिकेवर प्रवास करणार आहेत. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होणार तसेच याकरिता कोळसा जाळले जाणार नाही. यामुळे, दोन लाख मेट्रीक टन प्रदूषण कमी होणार आहे.  ही मेट्रो पर्यावरणपूरकच आहे. कारशेडमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा या मेट्रोमुळे मुंबईतील पर्यावरणाचे संवर्धन करण्यास हातभार लागणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

वाहतूक कोंडीचा प्रश्न लागणार मार्गी

मुंबईतील वाहतूक कोंडी त्यामुळे दूर होईल. लोकांना सुरक्षित, सुखकर आणि वेगवान प्रवासाचे साधन उपलब्ध होईल. त्यामुळे पर्यावरण प्रेमींना माझे आवाहन आहे की त्यांनी आपला विरोध मागे घेत कारशेडचा मार्ग प्रशस्त करावा. कारशेडचे काम आम्ही अत्यंत संवेदनशीलपणे पूर्ण करू. कारशेड कार्यान्वीत झाल्यानंतरच सभोवतालच्या पर्यावरणावर त्यामुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही याचीही काळजी युती सरकार घेईल, असे सामंत यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

आरेतल्या जागेचा वाद काय?

मेट्रोचं कारशेड हे आरेत नेणं ही पर्यावरणाची हानी आहे. त्यामुळे या जागेवर कारशेड बांधू नये असे म्हणत शिवसेना ही पहिल्यापासून या निर्णयाला विरोध करत आहे. या वादात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचीही भूमिका अत्यंत महत्वाची राहिली आहे. तर या ठिकाणी झाडं तोडण्यास परवागी घेण्यापासूनचं प्रकरण हे कोर्टापर्यंत पोहोचला आहे. तसेच पर्यावरणप्रेमींनीही या निर्णयाला कडाकडून विरोध केला आहे. त्यामुळे आता पुन्हा कारशेड हे आरेत गेल्यास हा वाद पुन्हा भडकण्याची दाट शक्यता आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....