केरे पाटलांच्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास, महाराष्ट्र बंद करण्याचा कुणी दिला इशारा ?
रमेश केरे पाटील यांच्या नावाने ऑडिओ क्लिप व्हायरल करून बदनामी केल्या जात असल्याचा आरोपही आप्पासाहेब कुढेकर यांनी करत नाराजी व्यक्त केली आहे.
संजय सरोदे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील (Ramesh Kere Patil) यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Suicide attempt) केला आहे. फेसबूक लाईव्ह करत त्यांनी विषप्राशन करत बदनामी केली जात असल्याचं म्हंटले आहे. त्यात ज्यांनी बदनामी केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी जीवनयात्रा संपवत असल्याचे म्हंटले आहे. रमेश केरे पाटील यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू असून त्याठिकाणी अनेक मराठा नेते देखील पोहचले आहे. रमेश केरे पाटील यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास महाराष्ट्र बंद करू अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आप्पासाहेब कुढेकर यांनी दिली आहे. रमेश केरे यांची ऑडिओ क्लिप आणि फोटो व्हायरल करण्यासाठी कॅम्पेन राबवल्या जात असल्याचा आरोप देखील कुढेकर यांनी केला आहे.
मराठा आरक्षण आता मिळण्याची शक्यता कमी वाटत असल्याने चार वर्षानंतर ऑडिओ क्लिप व्हायरल करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप आबासाहेब कुढेकर यांनी केला आहे.
रमेश केरे पाटलांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास महाराष्ट्र बंद करू असा इशारा आप्पासाहेब कुढेकर यांनी दिला आहे.
रमेश केरे पाटील यांच्या नावाने ऑडिओ क्लिप व्हायरल करून बदनामी केल्या जात असल्याचा आरोपही आप्पासाहेब कुढेकर यांनी करत नाराजी व्यक्त केली आहे.
रमेश केरे पाटील यांच्या नावाचा उल्लेख करून काही दिवसांपूर्वी कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
त्यात रमेश केरे पाटील यांच्या बाबतचा उल्लेख होता, त्यावर देखील फेसबूक लाईव्ह करत असतांना केरे पाटील यांनी स्वतः माझी बदनामी सुरू असल्याचे म्हंटले आहे.
केरे पाटील हे फेसबूक लाईव्ह करत असतांना मुंबईतील चर्चगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये होते, त्यावेळी त्यांनी विषप्राशन केल्याचे त्यात दिसून येत आहे.