मुझको भी लिफ्ट करा दे, मै बोला ठहरो… अब्दुल सत्तारांकडे कोण लिफ्ट मागतंय ?
अब्दुल सत्तार बोलतांना म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आत्मविश्वास कमी झालेला नाही, आत्मविश्वास कमी झाला असता तर शिंदे गटात लोकांनी प्रवेश केला नसता.
नाशिक : कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेससह ठाकरे गटाचे नेते शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचे शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे. यावेळी बोलतांना ते म्हणाले, इतर पक्षांचे नेते मला म्हणतात, मुझको भी लिफ्ट करा दे, मै बोला ठहरो अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. शिंदे गटाचे मंत्री, आमदार आणि पदाधिकारी आज गुवाहाटी दौऱ्याला जात आहे. मात्र, शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार हे गुवाहाटीला न जाता कृषीप्रदर्शनाला नाशिकमध्ये आले होते. त्यामुळे अब्दुल सत्तार नाराज आहे का ? अशी चर्चा असतांना अब्दुल सत्तार यांनी मी नाराज नसल्याचा दावा करत भुवया उंचवणारे विधान केले आहे. अब्दुल सत्तार यांनी मी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात होतो. त्यामुळे नाराज कोण आहेत मला माहिती असून लवकरच अनेकांचे शिंदे गटात प्रवेश होतील असंही सत्तार यांनी म्हंटले आहे.
अब्दुल सत्तार बोलतांना म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आत्मविश्वास कमी झालेला नाही, आत्मविश्वास कमी झाला असता तर शिंदे गटात लोकांनी प्रवेश केला नसता.
शिंदे गटात कुणीही नाराज नाही, लवकरच मंत्रिमंडळाचा दूसरा विस्तार होणार आहे. लवकरच शपथविधी होणार आहे, त्यामुळे आमच्यात नाराजी नसून कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये नाराजी असल्याचा दावा सत्तार यांनी केला आहे.
मुझको भी लिफ्ट करा दे, मै बोला ठहरो…असं मला ज्यांना प्रवेश करायचा आहे त्यांना सांगत असल्याचे देखील अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे, मात्र यावेळी त्यांनी नावे जाहीर केलेली नाही.
नाशिकमधील 12 नगरसेवक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे मी ऐकून आहे, त्यामुळे शिंदे गटाचा वाढत असून इतर पक्षाच्या तुलनेत आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढत चालल्याचे म्हंटले आहे.
गुवाहाटी दौरा झाला कि अनेक प्रवेश होतील आणि मंत्रिमंडळ विस्तार देखील होणार असल्याचे सत्तार यांनी म्हंटले तरी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अनेक नेते इच्छुक असल्याचा दावा सत्तार यांनी केला आहे.
गुवाहाटीला न जाता अब्दुल सत्तार यांचा नाशिक आणि सिल्लोड येथे नियोजित कार्यक्रम असल्याने मी गुवाहाटीला गेलो नाहीत, असा खुलासा देखील अब्दुल सत्तार यांनी केला आहे.