उद्धव ठाकरे हा दानशूर व्यक्ती, तुमच्यासारखा भिकारी नाही; अब्दुल सत्तारांचा भाजपवर घणाघात

भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. | Abdul sattar

उद्धव ठाकरे हा दानशूर व्यक्ती, तुमच्यासारखा भिकारी नाही; अब्दुल सत्तारांचा भाजपवर घणाघात
राज्यमंत्री अब्दुल सत्तार
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 10:04 AM

धुळे: अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपकडून राज्यात राबवण्यात येत असलेल्या निधी संकलन मोहीमेवरून शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विरोधकांना लक्ष्य केले. भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला. (Shivsena leader Abdul Sattar slams BJP)

ते रविवारी धुळ्यात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या संकल्प मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपला चांगलेच फैलावर घेतले. भाजपने दगा केला नसता तर आज राज्यात युतीची सत्ता असती. भाजप हा गरीबांचा नव्हे तर उद्योगपतींचा पक्ष आहे. राम मंदिराच्या नावाने निधी संकलन करणाऱ्या भाजपने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानायला हवेत, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.

‘सत्ता पडण्याची वाट पाहणारे हँग झाले’

महाविकासाघाडीचे सरकार पडण्याची वाट पाहणारे हँग झाले आहेत. गेल्या 16 महिन्यांपासून सरकार आहे तिथेच आहे, असे सांगत अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना लक्ष्य केले. माझं नाव सत्तार आहे, मी सत्तेतच राहणार, अशी शाब्दिक कोटीही त्यांनी केली. तसेच आगामी काळात ग्रामपंचायतींच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

धुळे महानगरपालिकेवर भगवा फडकवणारच

आगामी निवडणुकीत धुळे महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. धुळे महानगरपालिकेत शिवसेनेचे 55 नगरसेवक निवडून येतील. शिवसैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याला शिव दरबार भरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘वाचाळांमध्ये कृतीतून बोलणारा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे’

सध्याच्या वाचाळ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत. बोले तैसा चालेल त्याची वंदावी पाऊले. लॉकडाऊनदरम्यान मंदिरे सुरु करण्यासंदर्भात मागणी होत होती. मात्र त्यावेळी धर्म म्हणजे केवळ मंदिर नाही, अशाप्रकारे परिस्थिती उद्धव ठाकरेंनी हाताळल्याचे सांगत शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते.

संंबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर फाईलमधला शेराच बदलला; अशोक चव्हाणांच्या सतर्कतेमुळे धक्कादायक प्रकार उघड

भाजपनं प्रभू रामाची मूर्ती उभारली, शिवसेना नेत्या म्हणतात यांनी तर सीतेला वेगळं केलं!

मालवणीत भाजपाने लावलेले प्रभू रामाचे पोस्टर्स पोलीसांनी फाडल्याचा आरोप, प्रकरण चिघळणार?

(Shivsena leader Abdul Sattar slams BJP)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.