अभिजित बांगरांचा दणका, वाशी रुग्णालयातील 17 डॉक्टरांवर वेतन कपातीची कारवाई

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर (Abhijit Bangar) यांनी वाशी रुग्णालयातील 17 डॉक्टरांवर वेतन कपातीची कारवाई केली.

अभिजित बांगरांचा दणका, वाशी रुग्णालयातील 17 डॉक्टरांवर वेतन कपातीची कारवाई
नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 4:13 PM

नवी मुंबई: महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी हजेरीपत्रकावर अनुपस्थिती असल्याप्रकरणी डॉक्टरांवर मोठी कारवाई केली आहे. वाशी रुग्णालयातील 17 डॉक्टरांवर वेतन कपातीची कारवाई करण्यात आली आहे. आयुक्तांनी वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयातील 18 डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. संबंधितांनी या प्रकरणी खुलासा सादर केला असून त्यातील 17  जणांचा खुलासा आयुक्त अभिजित बांगर यांनी अमान्य केला आहे. ( Abhijit Bangar ordered to salary cut of doctors for absentee)

अभिजित बांगर यांनी 8 डिसेंबरला पालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयाला भेट दिली होती. या पाहणीमध्ये हजेरीपत्रक तपासताना आयुक्तांना वैद्यकीय अधिकारी हजेरीपत्रकावर अनुपस्थित असल्याचे आढळून आले. बांगर यांनी गांभीर्याने दखल घेत बांगर यांनी 18 ऑनकॉल मेडिकल ऑफिसर्सना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. डॉक्टरांची हजेरी आणि इतर जबाबदारी असलेले वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य विभागाच्या कामकाजावर नियंत्रण असणारे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

डॉक्टरांचा खुलासा अमान्य, 17 जणांची वेतनकपात

18 डॉक्टरांपैकी 17 जणांनी सादर केलेला खुलासा आयुक्त बांगर यांनी अमान्य केला आहे. 17 ऑनकॉल मेडिकल ऑफिसर्सची वेतनकपात करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी सादर केलेला खुलासाही आयुक्तांनी अमान्य करण्यात आला आहे.

दरम्यान, दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांतील डॉक्टरांपासून ते वर्ग ४ श्रेणीतील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी कटिबद्ध राहणे आवश्यक आहे. त्यामुळे डॉक्टरांची किंवा इतर कर्मचाऱ्यांची विनापरवानगी अनुपस्थिती अथवा कर्तव्यात कसूर दिसून आली तर ती शिक्षेस पात्र राहील. याबाबत सर्वांनी दखल घेणे गरजेचे आहे, असे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले आहे.( Abhijit Bangar ordered to salary cut of doctors for absentee)

महापालिका आयुक्तांची वाशी रुग्णालयाला भेट

अभिजित बांगर यांनी 8 डिसेंबरला वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाला भेट दिली होती. पाहणीमध्ये हजेरीपत्रक तपासताना ऑनकॉल मेडिकल ऑफिसर हजेरीपत्रकावर अनुपस्थित असल्याचे आढळून आले. याची गांभीर्याने नोंद घेत ऑनकॉल मेडिकल ऑफिसर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते.

Abhijit Bangar doctors salary

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी 8 डिसेंबरला वाशी रुग्णालयाला भेट दिली होती.

संबंधित बातम्या:

मुंबई, नवी मुंबईकरांनो तुम्ही का गुदमरताय? ही बातमी तुमच्यासाठी

रुग्णालयात गैरहजर अधिकाऱ्यांना थेट नोटिसा, नवी मुंबई पालिका आयुक्त ‘अ‍ॅक्शन मोड’वर

( Abhijit Bangar ordered to salary cut of doctors for absentee)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.