नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असलेले बिचुकले, दवे यांना किती मतं ? तिसऱ्या फेरी अखेर मतदानाचे आकडे पाहून…

कसबा पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकले आणि आनंद दवे यांना मिळालेली मते पाहून सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे. विजयाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना बोटावर मोजण्याइतकीच मते मिळाल्याने चर्चा होत आहे.

नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असलेले बिचुकले, दवे यांना किती मतं ? तिसऱ्या फेरी अखेर मतदानाचे आकडे पाहून...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 10:10 AM

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत सर्वच पक्ष आपला उमेदवार जाहीर करत असतांना दोन उमेदवाऱ्या मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिल्या यामध्ये एक उमेदवारी म्हणजे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले ( Abhijeet Bichukale ) आणि दुसरे म्हणजे हिंदू महासंघाचे ( Ananad Dave ) आनंद दवे. दोघांनी विजय आमचाच होईल असा दावा केला होता. त्यामुळे राजकीय पक्षांचे काय अशी चर्चा सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरली होती. नेटकऱ्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. सहाव्या फेरी अखेर अभिजीत बिचुकले यांना फक्त बोटावर मोजण्या इतकी मतं मिळाली आहे. अभिजीत बिचुकले यांना अवघी चार मतं मिळाली असून सहाव्या फेरी अखेर त्यामध्ये सातत्य कायम आहे. तर दुसरीकडे ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी विजयाचा दावा केला होता त्यांना तिसऱ्या फेरीपर्यंत अवघी 12 मते मिळाली आहे. तर सहाव्या फेरी अखेर त्यांना 100 मतं मिळाली आहे.

कसबा पोटनिवडणूक बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि आनंद दवे यांच्यामुळे अधिकच चर्चेत आली आहे. मात्र, यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात खरी लढत पाहायला मिळत आहे. असून त्यामध्ये रवींद्र धंगेकर आघाडीवर आहे.

रवींद्र धंगेकर यांना तिसऱ्या फेरीअखेर 11 हजार 157 मतं मिळाली असून हेमंत रासने यांना 10 हजार 673 मतं मिळाली आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली असून हेमंत रासने यांना मोठा धक्का दिला आहे. पेठांमध्येही धंगेकर आघाडीवर आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान निवडणूक पक्रिया जाहीर झाली तेव्हा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी माझाच विजय होणार असल्याचा दावा केला होता. टिळक कुटुंबात उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण नाराज असल्याचे सांगत निवडणुकीत माझा विजय निश्चित असल्याचा दावा केला होता.

तर दुसरीकडे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही माझा विजय होईल. मी या मतदार संघात राहणारा असल्याचे सांगत जनता या राजकारण्यांना वैतागली असल्याची टीका करत माझा विजय होईल असा दावा केला होता. त्यामुळे नेटकऱ्यांनी बिचुकले यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

मात्र बिचुकले आणि दवे यांनी उमेदवारी केली असली तरी त्यांना पहिल्या तीन फेरीपर्यन्त बोटावर मोजण्या इतकीच मतं मिळाली आहे. त्यामुळे बिचुकले आणि दवे यांना किती मतं मिळाली यावर सोशल मिडियावर चर्चा होऊ लागली आहे. त्यामध्ये बिचुकले यांना आवगी चार मतं सहाव्या फेरीच्या अखेर पर्यन्त मिळाल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.