अभिजित बिचुकले यांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र… नवी मागणी, राज्यातील सामान्य जनतेचं गाऱ्हाणं मांडलं

राज्याचा पुढील मुख्यमंत्री महिलाच असली पाहिजे, असं वक्तव्य करणाऱ्या अभिजित बिचुकले यांनी महिला वर्गासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आणखी एक मागणी केली आहे.

अभिजित बिचुकले यांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र... नवी मागणी, राज्यातील सामान्य जनतेचं गाऱ्हाणं मांडलं
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 10:31 AM

सातारा : नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धी झोतात असलेले बिग बॉस (Big boss) फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नुकतेच ते चर्चेत आले होते. आता बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र लिहिलंय. राज्यभरातील तमाम महिलावर्गाकडून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना 50 टक्के सवलत दिली आहे. मात्र महिला वर्ग फक्त प्रवासच करत नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी स्वयंपाक करतात. घर सांभाळतात. खरी गरज आहे सिलिंडरच्या किंमती कमी करण्याची, त्यामुळे सिलिंडरच्या किंमतीत पन्नास टक्के सवलत द्या, अशी मागणी बिचुकले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय.

मुख्यमंत्र्यांना पत्र

अभिजित बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात लिहिलंय, ‘ महिला वर्गाला एस टी बस च्या प्रवासासाठी 50 टक्के सवलत दिली त्याबाबत सरकारचं अभिनंदन करतो. याचा आनंद आहे. पण खऱ्या अर्थाने जर विचार केला तर सर्वसामान्य, गरीब किंबहुना उच्चवर्णीय महिलांसाठी दैनंदिन जिव्हाळ्याचा विषय असेल तर तो राज्यातील गॅस सिलिंडरच्या दरातील प्रचंड वाढ. नूतन मराठी वर्षानिमित्त नागरिकांसाठी काही चांगले करायचे असल्यास सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी ही विशेष सूचना करतोय. महाराष्ट्र राज्यातील गॅस सिलिंडरची किंमत आपण 500 रुपये इतकी करावी. राज्यशासनाच्या कोट्यातून सिलिंडरच्या किंमतीत ५० टक्के अनुदान तथा सवलत जाहीर करावी म्हणजेच खऱ्या अर्थाने गरीबांची तसेच महिलांची दक्षता घेणारे हे सरकार आहे, असे म्हणता येईल….

माझी कॉपी करू नये…

महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री महिला असेल ही भूमिका मी प्रथम मांडली होती. त्यानंतर लोकं माझी कॉपी करायला लागले, असा टोला बिचुकले यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तर कॉपी करणाऱ्यांवर खोचक टीकाही केली. मी बैल आहे माझी कॉपी कोणी करु नये. बेडकानं बैल व्हायचं पाहू नये, असा खोचक टोला देखील बिचुकलेंनी यावेळी लगावला.

कसबा निवडणुकीत चर्चेत

साताऱ्याचे रहिवासी असलेल्या अभिजित बिचुकले यांनी नुकत्याच झालेल्या पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतही उमेदवारी भूषवली. कसब्यातील नागरिकांसाठी त्यांनी नव-नवीन आश्वासनं दिली. मात्र त्यांना मोजका आकडाही गाठता आला नाही. महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.