फक्त सुप्रिया सुळेच नाही तर अभिजित बिचुकलेही बसलेत मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर; व्हायरल फोटोवरुन संताप
सुप्रिया सुळेंप्रमाणेच अभिजित बिचुकलेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोवर अभिजीत बिचुकलेचा संताप व्यक्त केला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(supriya sule) मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो व्हायरल झाला होता. यानंतर आता बिग बॉस फेम अभिजित बिचुकले(Abhijit Bichukale) यांचाही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमुले अभिजित बिचुकले चांगलेच संतापले आहेत. फोटो कोणी मॉर्फ केला असेल त्यावर कारवाई करा अशी मागणी बिचुकले यांनी केली आहे.
सुप्रिया सुळेंप्रमाणेच अभिजित बिचुकलेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोवर अभिजीत बिचुकलेचा संताप व्यक्त केला आहे.
हा चेष्टेचा विषय नाही. मुख्यमंत्री हे पद अस्मितेच पद आहे. मुख्यमंत्र्यांना संविधानिक पद असल्यान असं करायला नाही पाहिजे असं म्हणत अभिजित बिचुकलेची व्हायरल फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळेंचा फोटो देखील व्हायरल झाला आहे. अशा प्रकारे फोटो व्हायरल करने चुकीचे आहे. फोटो कोणी मॉर्फ केला याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करा असे अभिजित बिचुकले म्हणाले.
काय आहे व्हायरल फोटोचे प्रकरण
शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. यानंतर हा फोटो व्हायरल झाला.
या फोटोवरुन टीका झाल्यानंतर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे मी तो ट्विट केला असा खुलासा शितल म्हात्रेंनी केला. हा फोटो मॉर्फ केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने याविरोधात वरळी पोलिस ठाण्यात म्हात्रेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पुण्यात शितल म्हात्रेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. शितल म्हात्रेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.