माझ्या जीवाला धोका, सलमान खानसारखं संरक्षण का नाही ? तेजस्वी घोसाळकर यांची पोस्ट चर्चेत
अभिनेता सलमान खान याच्या घरावर रविवारी पहाटे गोळीबार झाल्यामुळे एकच खळबळ माजली असून पोलिस आणि सरकार दोन्ही कामाला लागलं आहे. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा कसून शोध घेण्यात येत आहे. या गोळीबारानंतर सलमानच्या सुरक्ष व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. मात्र याच मुद्यावरून ठाकरे गटाचे माजी नगरसेवक, दिवंगत अभिषेक घोसाळकर यांची पत्नी, तेजस्वी घोसाळकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
अभिनेता सलमान खान याच्या घरावर रविवारी पहाटे गोळीबार झाल्यामुळे एकच खळबळ माजली असून पोलिस आणि सरकार दोन्ही कामाला लागलं आहे. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा कसून शोध घेण्यात येत आहे. या गोळीबारानंतर सलमानच्या सुरक्ष व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. मात्र याच मुद्यावरून ठाकरे गटाचे माजी नगरसेवक, दिवंगत अभिषेक घोसाळकर यांची पत्नी, तेजस्वी घोसाळकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर माझ्या जीवालाही धोका आहे, मला सलमान खानप्रमाणे सुरक्षा का नाही ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच अभिषेक घोसाळकरांच्या हत्येच्या तपासावर देखील तेजस्वी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली असून ती सध्या खूप चर्चेत आली आहे. सलमान खानच्या केसला तपास यंत्रणा देत असलेल्या प्राधान्यावरून तेजस्वी घोसाळकर यांनी या पोस्टमधून अनेक प्रश्न विचारले आहेत.
8 फेब्रुवारी रोजी दहिसरमध्ये अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मॉरिस नरेन्हा याने फेसबूक लाइव्हदरम्यान घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. यामध्ये घोसाळकर आणि मॉरिस या दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेला आता दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला असला तरीही अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप तेजस्वी यांनी केला आहे. गेल्या महिन्यातही घोसाळकर कुटुंबियांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या पतीच्या हत्याच्या प्रकरणात योग्यप्रकारे तपास होत नाही, असा आरोप केला. अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर यांनीही या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आज पुन्हा तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणातील तपासासंबधी अनेक प्रश्न विचारले आहेत.
काय म्हणाल्यात तेजस्वी घोसाळकर ?
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळ्या झाडण्याता आल्या, ज्यानंतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीने त्वरित कारवाई केली. या हाय-प्रोफाईल घटनेवर त्वरित लक्ष केंद्रित केले गेले. पण माझे पती अभिषेक घोसाळकर हत्येच्या केसचा उलगडा करण्याकडे पोलिस दुर्लक्ष करत आहेत.
सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर तपासासाठी गुन्हे शाखेची सर्व युनिट्स एकत्र आली. मात्र मॉरिस नरेन्हाकडून माझे पती अभिषेक घोसाळकर यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली त्या मर्डर केसचा तपास केला जात नाहीये असा आरोप तेजस्वी यांनी केला आहे.
माझ्या जीवाला धोका, मला सलमान सारखं संरक्षण का नाही ?
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर माझ्या जीवाला धोका असतानाही माझ्या सुरक्षेकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे, ही चिंतानजक बाब आहे. मला सलमान खानसारखे संरक्षण, सुरक्षा का दिली जात नाही ? असा सवालही तेजस्वी यांनी विचारला आहे. एखाद्या व्यक्तीची सामाजिक स्थिती कशी आहे, तो सेलिब्रिटी आहे की सामान्य व्यक्ती असा विचार न करता त्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे, असेही तेजस्वी घोसाळकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
View this post on Instagram
फेसबूक लाइव्हदरम्यान हत्या
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवकावर अभिषेक घोसाळकर यांची गेल्या महिन्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दहीसरमधील मॉरिसभाईच्या कार्यालयात अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई सोबतच फेसबुक लाईव्ह करत होते. त्यानंतर अचानक मॉरिस भाई याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. आणि त्याने स्वत:वर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ माजली होती. मॉरिसने जी पिस्तुल वापरून अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या ती पिस्तुल त्याची नव्हे तर त्याच्या बॉडीगार्डची अमरेंद्र मिश्रा याची होती. त्यामुळे या हत्याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी त्यालाही अटक केली होती.