लालपरी कात टाकणार, अशोक लेलॅण्ड कंपनीच्या सुमारे 2000 बसेस दाखल होणार
दोन वर्ष कोरोनाची साथ आणि त्यानंतर सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संपामुळे एसटी महामंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते.आता एसटी महामंडळाला अशोक लेलॅंण्डच्या ब्रॅंड न्यू दोन हजार बसेस मिळणार असल्याचे प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.
एसटी महामंडळ लवकरच कात टाकणार आहे. एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात तब्बल 2475 गाड्याना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्या आहेत. एसटी महामंडळाने अशोक लेलॅंण्ड कंपनीला 2475 गाड्याच्या बांधणीचे कंत्राट दिले आहे. एसटीच्या ताफ्यात सध्या 15 हजार गाड्यांचा ताफा असून एसटीच्या अनेक गाड्या नादुरुस्त असल्याने प्रवाशांनी चांगली सोय देण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे अशोक लेलॅण्डच्या डिझेलवरील नव्या ऐसपैस बसमधून आधुनिक असल्याने एसटीच्या प्रवाशांना चांगली सेवा मिळणार आहे.
एसटीच्या ताफ्यात नवीन बसचा समावेश ऑक्टोबर महिन्यापासून होण्याची शक्यता आहे. या बस टु बाय टू आसनी असून एका बसचा अंदाजित खर्च 38.26 लाख रुपये असणार आहे.या बस आधुनिक असणार असून CMVR स्टॅंडर्डच्या असणार आहेत. या बसची बॉडी AIS 153 असणार आहे. या BS VI स्टॅंडर्डच्या असणार आहे. या बसला 197 एचपी – एच सिरिजचे इंजिन आहे. या बस रिअर एअर सस्पेन्शनसह अन्य सुविधा असलेल्या आहेत.या बसेस अशोक लेलॅण्ड कंपीच्या प्लांटमध्ये बांधल्या जाणार आहेत. नव्या तंत्राने तसेच प्रवाशांची सुरक्षा पाहून राज्य परिवहन महामंडळाच्या गरजेनुरुप त्या बांधण्यात येणार आहे. अशोक लेलॅण्ड जगातील पाचवी सर्वात मोठी बस निर्मिती करणारी कंपनी असून भारताची सर्वात मोठी बस निर्माण करणारी कंपनी आहे. एसटी महामंडळाची एवढी मोठी ऑर्डर अशोक लेलॅण्डला मिळाल्याने महाराष्ट्रातील जनतेला सुरक्षित आणि उच्च दर्जाची बसेस आम्ही पुरविणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
सध्या 53 लाख प्रवासी दररोज प्रवास करतात
कोरोना काळ आणि एसटी महामंडळाचा ऐन दिवाळीत झालेल्या संपामुळे महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले. मे 2022 पासून एसटीची वाहतूक पुन्हा सुरू झाली. मात्र, एसटीचे प्रवासी घटले असून ते पुन्हा वाढविण्याचे आव्हान होते. परंतू एसटी महामंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने 75 वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि सर्व महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास सवलत या दोन योजना सुरू केल्या.त्यामुळे एसटीकडे पुन्हा प्रवासी वळले. सध्या 53 लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत. जुलै महिन्यात महामंडळाच्या 31 विभागांपैकी 18 विभागांना प्रथमच नफा झाला. या महिन्यात एसटी महामंडळाला 22 कोटीचा नाम तोटा झालेला आहे. यंदा एप्रिल ते जुलै,2024 मध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 131 कोटी रुपयांनी कमी तोटा झाला आहे.