इनोव्हा कार ट्रकवर धडकली, दर्शनाला जाणाऱ्या चार भाविकांचा मृत्यू

| Updated on: Jul 01, 2024 | 9:16 AM

yavatmal accident news: यवतमाळ -नागपूर महामार्गवर अपघातात दर्शनासाठी जाणाऱ्या 4 भाविकांचा मृत्यू झाला. तसेच 1 जण गंभीर जखमी झाला आहे. पंजाब येथील शीख कुटूंब दर्शनाला नांदेड येथील गुरुद्वाराला दर्शनाला जात असताना हा अपघात झाला.

इनोव्हा कार ट्रकवर धडकली, दर्शनाला जाणाऱ्या चार भाविकांचा मृत्यू
अपघातात गाडीचे झालेले नुकसान
Follow us on

राज्यातील विविध मार्गांवर अपघातांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे अपघात आणि अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्याही राज्यात वाढत आहेत. यवतमाळ -नागपूर महामार्गवरील चापरडा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात दर्शनासाठी जाणाऱ्या 4 भाविकांचा मृत्यू झाला. तसेच 1 जण गंभीर जखमी झाला आहे. पंजाब येथील शीख कुटूंब दर्शनाला नांदेड येथील गुरुद्वाराला दर्शनाला जात असताना हा अपघात झाला. थांबलेल्या ट्रकला त्यांची इनोव्हा गाडी मागून धडकली. या अपघातात इनोव्हा गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गावरही भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर दोन कारच्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील एक असलेली स्विफ्ट कार ही बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील होती. या कारमधील चार तरुणांचा देखील या अपघातात मृत्यू झाला. या तरुणांचा अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आलाय आहे. जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन कार समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दोन गाड्यांची टक्कर भीषण होती. त्यामुळे महामार्गावरील कठड्याला एमयूव्ही धडकली आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला पडली. कटरच्या सहाय्याने दरवाजे कापून मयत आणि जखमींना बाहेर काढावे लागले.

१५ दिवसांपूर्वीच विवाह

मिळालेल्या माहितीनुसार देऊळगाव राजा तालुक्यातील हे तरुण सकाळीच गोवा जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी मद्यपान केले होते. त्यानंतर समृद्धी महामार्गावरुन गोव्याकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र मद्याच्या नशेत असल्यामुळे त्यांनी परत घराकडे जाण्याचा निर्णय घेतला. समृद्धी महामार्गावर वनवे असल्याने त्यांनी चुकीच्या बाजूने गाडी चालवली. यावेळी समोरून येणाऱ्या अर्टिगागाडीला धडकून अपघात झाल्याची माहिती आहे. पर्यटनासाठी गोवा जाणाऱ्या विलास कायंदे, संदीप बुधवंत, अनिकेत चव्हाण आणि प्रदीप मिसाळ या चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यातील संदीप याचा १५ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. तर अर्टीगा कारमधील मुंबईचे रहिवासी असलेल्या दोन जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहेत.

हे सुद्धा वाचा

अपघातात या सात जणांचा मृत्यू

अपघातात फयाज शकील मंसुरी, फैजल शकील मंसुरी, अल्थमेश मंसुरी (सर्व रा. मालाड पूर्व, मुंबई), प्रदीप लक्ष्मण मिसाळ (वय ३०, रा. पिंपळगाव, ता. देऊळगावराजा), संदीप माणिकराव बुधवत (वय ३०), विलास सुदाम कार्यदे (वय २८, दोघेही रा. उंबरखेड, ता. देऊळगावराजा) व अनिकेत चव्हाण (वय ३०, रा. देऊळगावराजा) या सात जणांचा मृत्यू झाला. तर शकील मंसुरी, अल्ताफ मंसुरी, राजेश कुमार हे तिघे जखमी झाले आहेत.