Nashik Accident | टायर फुटल्यानं अपघात, संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली कार
नाशिक (Nashik) येथून येवला-औरंगाबाद मार्गे जालना येथे जाण्यासाठी निघालेल्या अर्टिगा (Ertiga) कारला अपघात (Accident) झाला. नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील येवला शहराजवळील गोशाळा मैदानासमोर हा अपघात झाला.
नाशिक (Nashik) येथून येवला-औरंगाबाद मार्गे जालना येथे जाण्यासाठी निघालेल्या अर्टिगा (Ertiga) कारला अपघात (Accident) झाला. नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील येवला शहराजवळील गोशाळा मैदानासमोर अर्टिगा कारचे टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या गो शाळेच्या संरक्षण भिंतीवरच कार जोरदार आदळली. यात चौघे किरकोळ जखमी झाले असून सीट बेल्ट लावल्यामुळे वेळीच एअरबॅगमुळे चौघांचे प्राण वाचले. ही घटना आज पहाटेच्या सुमारास तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे. या चौघांवर येवला येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले. गाडीचे फुटेज पाहिले असता गाडीचे नुकसान झाले आहे. टायर फुटल्यानंतर गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन जी संरक्षक भिंत आहे, त्याला जोरदार आदळली होती. त्यामुळे मोठा आवाजही त्याठिकाणी झाला होता. दरम्यान, आता गाडी बाजुला हटवण्याचे काम नंतर हाती घेण्यात आले.