भाजप आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू, किसन कथोरेही जखमी

भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात एक तरुण आणि एक तरुणी असे दोघांचा मृत्यू झाला आहे.

भाजप आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू, किसन कथोरेही जखमी
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 12:51 AM

कल्याण : भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात एक तरुण आणि एक तरुणी असे दोघांचा मृत्यू झाला आहे. आमदार किसन कथोरे यांच्याही मणक्याला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी कल्याणमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यावर उपचार सुरु आहेत (Accident of BJP MLA Kisan Kathore 2 dead in Kalyan).

भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीने कल्याण तालुक्यातील दहागावजवळ एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर असलेल्या एका तरुणाचा आणि तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाचं नाव अमित नंदकुमार सिंग असं आहे. हा तरुण कल्याण ग्रामीणमधील पिसवली परिसरातील रहिवासी होता. त्याच्यासोबत असलेल्या तरुणीचं नाव सिमरन सिंग असं आहे.

या अपघातात आमदार किसन कथोरे थोडक्यात बचावले आहेत. आमदार कथोरे यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. उपचारानंतर कथोरे यांना डिस्चार्ज मिळाला आहे. अपघात इतका भीषण होता की गाडीची एअर बॅगही फुटली. मृत तरुण हा आई-वडिलांचा एकुलता एक होता. त्यामुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. टिटवाळा पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

पेण-अलिबाग रोडवर पिकअप व्हॅनने दोन महिलांना उडवलं, एक ठार तर एक जखमी

नाशिक महामार्गावर मँगोफ्रुटी घेऊन जाणारा टॅम्पो पलटी, मार्गावर वाहतूक कोंडी

ताडोबा फिरायला निघालेल्या पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Accident of BJP MLA Kisan Kathore 2 dead in Kalyan

दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.