नागपुरात कोरोनाचा उद्रेक, तरीही नागरिक बेफिकीर, विनामास्क फिरणाऱ्यांकडून 27 लाख रुपयांचा दंड वसूल

महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहाही झोनमधील मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे.

नागपुरात कोरोनाचा उद्रेक, तरीही नागरिक बेफिकीर, विनामास्क फिरणाऱ्यांकडून 27 लाख रुपयांचा दंड वसूल
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 11:30 PM

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मास्क शिवाय फिरणाऱ्या (Action Against Unmasked People In Nagpur) बेजबाबदार 205 नागरिकांविरुध्द कारवाई केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे 1 लाख 2 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या काही दिवसात शोध पथकांनी 8841 नागरिकांविरुध्द कारवाई करुन 27 लाख 79 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे (Action Against Unmasked People In Nagpur).

नागपूरात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. तसेच, मृतांची संख्याही वाढत चालली आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहाही झोनमधील मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचावासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इत्यादींची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणाऱ्या नगारिकांना बचाव व्हावा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम 15 सप्टेंबर पासून 500 रुपये करण्यात आली आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत (Action Against Unmasked People In Nagpur).

नागपुरात आज कोरोनाच्या नवीन 1215 रुग्णांची नोंद

नागपुरात आज 1,215 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद करण्यात आली आहे. तर दिवसभरात एकूण 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 1,418 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

त्यामुळे सध्या नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 77 हजार 30 वर पोहोचली आहे. तर, बरं होणाऱ्यांची एकूण संख्या 61 हजार 115 इतकी आहे. तर आतापर्यंत 2 हजार 472 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

दुसरीकडे, नागपुरात कोरोना रुग्णांसाठी बेड्सची उपलब्धता वाढली आहे. महापौर संदीप जोशी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. जोखिमीची लक्षणं असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध व्हावे, यासाठी महापौर संदीप जोशी आणि आयुक्त राधाकृष्ण बी. यांच्यामार्फत करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येत आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या प्रयत्नाने आता खाजगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांकरिता खाटांची उपलब्धता केली जात आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये 580 तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये 240 बेड्स उपलब्ध झाल्याचे दिसून आले. कोव्हिड-19 च्या रुग्णांना यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

Action Against Unmasked People In Nagpur

संबंधित बातम्या :

नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या, मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनामुळे नागपूर मनपावर आर्थिक संकट, उत्पन्न 274 कोटींनी घटलं

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.