राजकारणात येण्याची मला ऑफर होती, पण… : नाना पाटेकर

"आपल्याला पाच वर्षाने मतदान करण्याचा हक्क मिळतो. मात्र आपण त्यांचे धिंडवडे काढतो. कारण आपण फक्त मत देतो. पण त्यांना प्रश्न विचारत नाही," असे नाना पाटेकर (Nana patekar Interview) म्हणाले.

राजकारणात येण्याची मला ऑफर होती, पण... : नाना पाटेकर
Follow us
| Updated on: Jan 22, 2020 | 10:48 PM

पिंपरी चिंचवड : कलारंग सांस्कृतिक कला संस्थेतर्फे अभिनेते नाना पाटेकर यांची मुलाखत आयोजित केली होती. समीरन वाळवेकर यांनी एक तोची नाना यात नाना पाटेकर यांची मुलाखत घेतली. डॉ.श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धाजंली देऊन या कार्यक्रमाला सुरुवात केली. “आपल्याला पाच वर्षाने मतदान करण्याचा हक्क मिळतो. मात्र आपण त्यांचे धिंडवडे काढतो. कारण आपण फक्त मत देतो. पण त्यांना प्रश्न विचारत नाही,” असे नाना पाटेकर (Nana patekar Interview) म्हणाले.

“मला राजकारणात येण्याची ऑफर होती. पण माझा तो पिंड नाही. कारण तिथं गेलो तर कोणकोणत्या पक्षात जायचं. एका वेळेनंतर पुढे पक्षच उरायचे नाही. शेवटी मी एकटाच राहायचो,” असेही नाना पाटेकर म्हणाले.

“भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षाची नियमावली चांगली आहे. फक्त त्याची अंमलबजावणी आणि पायमल्ली हाच फरक. विजयबाई हा पक्ष मला मिळाला. तो माझ्यासाठी महत्वाचा,” असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमात नाना पाटेकरांनी पक्षांतर करणाऱ्यांना चिमटा काढला.”आझम भाई पानसरे कसे आहात. आता कोणता पक्ष. अहो काय करणार मी म्हणायचं आज या पक्षात का? मग ते म्हणतात नाही दुसऱ्या पक्षात आहे. म्हणून विचारतो मी,” असे ते (Nana patekar Interview) म्हणाले.

“गृहमंत्री अमित शहांनी माझं एक काम पटकन केलं. चांगल्या कामाची ओळख झाली की मग कोणत्या ही पक्षाचा असो, तो आपली चांगली कामं करतोच. उद्धव ही माझा, शरदराव ही माझेच, देवेंद्र ही माझाच, योग्य पैसे दिले तर तू ही माझाच (माझ्या चित्रपटात काम करा, अशी ऑफर देणाऱ्याला उद्देशून),” असेही नाना पाटेकर गमतीने म्हणाले.

“अपमान आणि भूक हे दोन माझे गुरु आहेत. कारण हे दोन्ही गुरू आयुष्य शिकवतात. मला त्यांनीच घडवलं. सुरुवातीच्या काळात अशोक सराफ मला खूप मदत करायचे. माझ्याकडे पैसे नसायचे म्हणून या ना त्या कारणाने ते आर्थिक मदत करायचे. कधीकधी मी त्यांचे हात-पाय चेपायचो. म्हणून ते पाच रुपये द्यायचे. आज ही अशोक सराफ भेटले की मी हात-पाय दाबतो आणि ते दहा रुपये देतात. त्यानंतर असू दे महागाई वाढली आहे,” असेही ते म्हणाले.

“कांद्याचा दर थोडा वाढला की लगेच बजेट कोलमडले. एखाद्या महिन्याचे तुमचे बजेट पडले तर काय फरक पडतो. त्या बळीराजाचे आयुष्याचे बजेट कोलमडले. त्याचा विचार करा थोडासा. मॉलमध्ये मुकाटपणे पैसे मोजता आणि शेतकऱ्याच्या भाजीचे मात्र दर पाडून मागता. भाजीचे मोल नका करु,” असेही नाना पाटेकर (Nana patekar Interview) म्हणाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.