सुजय विखेंना ‘या’ अभिनेत्रीचा एका अटीवर पाठिंबा!

अहमदनगर: शिवसंग्राम संघटनेच्या महिला अध्यक्षा आणि सिनेअभिनेत्री दीपाली सय्यदने भाजप उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा दिला आहे. दीपाली सय्यदने  लोकसभा निवडणुकीसाठी सुजय विखेंना पाठिंबा जाहीर केला. मात्र विधानसभा निवडणुकीत आपण उतरणार असल्याचं दीपाली म्हणाली. सुजय विखे साकळाई पाणी योजना पूर्ण करतील, त्यामुळे विखेंना पाठिंबा देत असल्याचं दीपाली सय्यदने सांगितलं. साकळाई पाणी योजनेसाठी मी पाठिंबा दिला आहे. […]

सुजय विखेंना 'या' अभिनेत्रीचा एका अटीवर पाठिंबा!
फोटो सौजन्य - @deepalisayedofficial
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

अहमदनगर: शिवसंग्राम संघटनेच्या महिला अध्यक्षा आणि सिनेअभिनेत्री दीपाली सय्यदने भाजप उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा दिला आहे. दीपाली सय्यदने  लोकसभा निवडणुकीसाठी सुजय विखेंना पाठिंबा जाहीर केला. मात्र विधानसभा निवडणुकीत आपण उतरणार असल्याचं दीपाली म्हणाली.

सुजय विखे साकळाई पाणी योजना पूर्ण करतील, त्यामुळे विखेंना पाठिंबा देत असल्याचं दीपाली सय्यदने सांगितलं. साकळाई पाणी योजनेसाठी मी पाठिंबा दिला आहे. ते पूर्ण होणार असेल तर सोशल मीडियातून प्रचार करेन, असं दीपाली सय्यदने सांगितलं.

दीपाली सय्यद मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून नगर दक्षिणच्या उमेदवार होत्या. मात्र आम आदमी पार्टी ही दिल्ली पुरती मर्यादित आहे. त्यामुळे मी आपचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसंग्राममध्ये प्रवेश केला, असं दीपाली सय्यदने सांगितलं.

कोण आहे दीपाली सय्यद?

  •  दीपाली सय्यद ही अभिनेत्री म्हणून परिचीत आहे
  • अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि रिअलिटी शोमध्ये दीपाली सय्यद दिसली आहे.
  • दीपाली सय्यदने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांच्या आपकडून निवडणूक लढवली होती.
  • त्या निवडणुकीत दीपाली सय्यदचा पराभव झाला होता.
  • दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी आप सोडून विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेते प्रवेश केला
  • गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद सामाजिक कार्यांमध्ये पाहायला मिळत आहेत.

सुजय विखे यांचा अर्ज दाखल

दरम्यान, सुजय विखे पाटील यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांच्यात लढत होत आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लढतींपैकी एक लढत म्हणून, राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे.

संबंधित बातम्या

उमेदवारी अर्ज भरताना आई-वडिलांची अनुपस्थिती, सुजय विखे गहिवरले  

सोलापूर, माढ्यात आघाडीला धक्का, आणखी एका बड्या नेत्याचा भाजप प्रवेश ठरला  

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.