राखी सावंत हिला मोठा झटका, भावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या; काय आहे प्रकरण ?
चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेत्री राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली असून त्याला 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई : अभिनेत्री राखी सावंत हिला मोठा झटका बसला आहे. चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेत्री राखी सावंतचा (Rakhi Sawant brother) भाऊ राकेश सावंतच्या (rakesh sawant) अडचणी वाढल्या असून ओशिवरा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राकेशला ज्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे, ते प्रकरण तीन वर्षे जुने आहे. राकेश सावंत यांच्यावर चेक बाऊन्स झाल्याचा हा गुन्हा एका व्यावसायिकाने नोंदवला होता. न्यायालयाने राकेश सावंत यांना पैसे परत करण्याच्या अटीवर जामीन दिला होता. मात्र राकेशने ते पैसे अद्यापही केलेले नाहीत. यानंतर न्यायालयाने पुन्हा अटक वॉरंट जारी केले. पोलिसांनी राकेशला 22 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राखी सावंतला बॉलिवूड इंडस्ट्रीची ‘ड्रामा क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते. मागील वर्षी राखीचा माजी पती आदिल खानबद्दल बरीच चर्चा झाली होती. राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले होते. आदिल आपल्याला मारहाण करायचा, असा आरोप राखी सावंतने केला होता. तो त्यांना फसवत होता. राखीने आदिलवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही केला होता. यादरम्यान राखीचा भाऊ राकेश त्याच्या बहिणीच्या समर्थनार्थ खंबीरपणे उभा राहिला.