World record: सूर्य विकणाऱ्या पोरांनी; सूर्यालाच थांबवून ठेवलय; आदित्यचा जगावेगळा विक्रम

| Updated on: Aug 10, 2022 | 11:13 AM

आदित्य भट त्याच्या कल्पनेतली फोटो काढतो, कधी त्याच्या फोटोत माशीने सूर्याला धरले आहे, तर माणसाची प्रतिमा काय धमाल करु शकते ते आदित्य भटचे फोटो पाहिल्यानंतरच लक्षात येते. कधी त्याच्या फोटोत मुंगी पाणी पिते, तर कधी मानवी डोळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते तर कधी गणराज दिसतो अशा एक ना अनेक भन्नाट कल्पना तो आपल्या फोटोतून मांडत असतो.

World record: सूर्य विकणाऱ्या पोरांनी; सूर्यालाच थांबवून ठेवलय; आदित्यचा जगावेगळा विक्रम
Follow us on

मुंबईः काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सूर्याचे काही फोटो व्हायरल झाले होते, एका मुलगा चक्क वजनकाट्यावरच सू्याचं वजन करत आहे, आणि वजन करून झाल्यावर तो सूर्य दुसऱ्या पोराला पिशवीत भरुन देत आहे आणि कहर म्हणजे दुसऱ्या त्या मुलाने तो दिलेला सूर्य पिशवीत भरुन घेऊन निघूनही जात आहे. सूर्य विकण्याचा हा जो क्रम आहे तो आदित्य भट (Aaditya Bhat) या छायाचित्रकाराने आपली कल्पना वापरून मोबाईलवर हे सगळे फोटो त्याने काढले आहेत. अशा एका ना अनेक संकल्पना ठेऊन आदित्यने अनेक फोटो काढले आहेत. पाणी पित असलेली मुंगी, सायकलवरुन सूर्याला घेऊन निघालेली मुलं, आंब्याला धरणारी ओंबाला, मानवी डोळ्यातील बुबूळातील टिपलेले क्षण असे एक ना अनेक संकल्पना ठेऊन त्याने फोटो काढले आहेत. त्याच्या या छंदामुळेच त्याने काही दिवसांपूर्वी मोबाईलवर त्याने एका मिनिटात 163 फोटो काढले, त्याच्या या वेगळ्या छंदाची दखल “वर्ल्ड वाईड बुक ऑफ वर्ल्डरेकॉर्ड”ने (World Wide Book of World Records) घेऊन त्याच्या फोटोग्राफीची (Photography) नोंद विश्वविक्रम म्हणून केली आहे. त्याच्या या विश्वविक्रमामुळे आता तो आणि त्याची फोटोग्राफी आणखी चर्चेत आली आहे.

 

आदित्य भट हा रत्नागिरीतील पावसमधील आहे. छंद म्हणून त्याने फोटोग्राफी जोपासली असली तरी त्याच्या प्रत्येक फोटोतून तो वेगळी संकल्पना मांडत असतो. त्यामुळे सोशल मीडियावरही त्याचे फोटो प्रचंड व्हायरल होतात. अनेक छायाचित्र स्पर्धेतून त्याच्या छायाचित्राना पुरस्कार आणि पारितोषिकं मिळाली आहेत.

रत्नागिरीतील आदित्यची जागतिक नोंद

रत्नागिरी जिल्ह्यातील पावसमध्ये 50 वर्षापूर्वीचं एक जुनं हॅाटेल भटाची मिसळ  फेमस आहे. त्यांचा हॉटेल मालकांचा आदित्य भट हा त्यांचा मुलगा. आदित्य भटच्या फोटोग्राफीची वर्ल्ड वाईड बुक ऑफ वर्ल्डरेकॉर्डने नोंद घेतल्यानंतर त्याने आपल्य छंदाविषयी फेसबुकवर पोस्ट लिहित हा छंद त्याला कसा जडला ते त्याने सांगितले आहे.

कोरोना काळात जपला छंद

कोरोना काळात सगळ जगच बंद झालं होतं, त्या काळात आदित्य भटने आपला फोटोग्राफीचा छंद जोपासत त्यातील वेगळीच नजाकतता साऱ्या जगाला दाखवली. साध्या मोबाईलवर फोटो काढून सोशल मीडियावर त्याने अपलोड केले की त्याच्या या फोटोला ढिगानं लाईक आणि कमेंट मिळतात.

पाणी पिणारी मुंगी

आदित्य भट त्याच्या कल्पनेतली फोटो काढतो, कधी त्याच्या फोटोत माशीने सूर्याला धरले आहे, तर माणसाची प्रतिमा काय धमाल करु शकते ते आदित्य भटचे फोटो पाहिल्यानंतरच लक्षात येते. कधी त्याच्या फोटोत मुंगी पाणी पिते, तर कधी मानवी डोळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते तर कधी गणराज दिसतो अशा एक ना अनेक भन्नाट कल्पना तो आपल्या फोटोतून मांडत असतो.

आयुष्याचं वर्तुळ

आदित्य भटने काढलेल्या “Life circle of leaf” या फोटोला Discover more या इंटरनॅशनल फोटोग्राफी पब्लिक ग्रुपने त्या्ंच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केला होता आणि त्याच्या या फोटोला तब्बल 1,47,000 लाईक्स आणि 19,000 शेकर्स मिळाले होते. आदित्य सध्या सोशल मीडियावरचा हिरो आहे हे त्याच्या फोटो आणि त्याच्या फॅन्सफोलोवर्सवरुच लक्षात येते.

सोशल मीडियावरचा हिरो

सूर्य विकणारी, आणि सूर्याला सायकलवरुन घेऊन जाणारी पोरं…हे त्याचे फोटो सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल झाले आहेत. त्या फोटोतून दिसणारी त्याची कल्पनेमुळेच त्याची जागतिक पातळीवरही नोंद घेतली गेली आहे.