महामोर्चात चालत होते…चालता-चालता शिंदे गटाला डिवचलं, आदित्य ठाकरे यांनी टाळ्या वाजवून कोणत्या घोषणा दिल्या, पाहा व्हिडिओ
महाविकास आघाडीच्या वतिने आज मुंबईत महामोर्चा काढण्यात आला आहे, त्याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत असतांना जोरदार घोषणाबाजी केली.
मुंबई : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर ठाकरे गटासह महाविकास आघाडीने शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उभे राहून दिलेल्या घोषणा शिंदे गटाला चांगल्याच जिव्हारी लागल्या होत्या. पन्नास खोके एकदम ओके अशा स्वरूपाच्या घोषणा विधिमंडळ परिसरात दिल्याने राज्यभर त्याची जोरदार चर्चा झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून संपूर्ण महाराष्ट्र जिथे जिथे दौरे झाले तिथे तिथे पन्नास खोके एकदम ओके अशा स्वरूपाच्या घोषणा दिल्याचे दिसून आल्या आणि याच घोषणा शिंदे गटाला जिव्हारी लागल्याचे दिसून आल्याने न्यायालयात देखील याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. इतकंच काय तर शिंदे गटातील आमदारांनी आम्ही कुणाच्या लग्नात गेलो तरी आम्हाला खोकेवाला आला असे म्हणतात म्हणून नाराजी व्यक्त केली होती. आणि त्याच घोषणा आज मुंबईच्या रस्त्यावर आदित्य ठाकरे यांनी दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
महाविकास आघाडीच्या वतिने आज मुंबईत महामोर्चा काढण्यात आला आहे, त्याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत असतांना जोरदार घोषणाबाजी केली.
याच घोषणेबाजी दरम्यान पन्नास खोके एकदम ओके अशा स्वरूपाच्या घोषणादेखील आदित्य ठाकरे यांनी टाळ्या वाजवून दिल्या आहे.
आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या या घोषणाबाजीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, शिंदे सरकारला आदित्य ठाकरे यांनी खोके सरकार म्हणून अनेकदा टीका केली आहे.
आजही मुंबईच्या रस्त्यावर शिंदे गटाला जिव्हारी लागणाऱ्या शुभेच्छा आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहे, त्यामुळे या मोर्चात पुन्हा शिंदे गटाच्या विरोधात घोषणेचा आवाज दुमदुमला होता.
महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी एकवटली असून पहिल्यांदाच कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने महामोर्चा काढल्याचे दिसून आले आहे.