दोन महिन्यांपूर्वी मी जे म्हणालो होतो ते आता घडत आहे, आदित्य ठाकरेंची भविष्यवाणी खरी ठरली ?
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वेदांता-फॉक्सकॉन गेल्यावर महाविकास आघाडीने भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली होती.
पुणे : राज्याचे माजी मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी एयर बसचा प्रकल्प गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटाला लक्ष केले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले मी गेल्या दोन महिन्यांपासून सांगत होतो आणि ते आता सत्य झाले आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमचे सरकार असतांना आम्ही आणू शकत होतो, उद्योगमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन त्यांना विचारायला हवं आमच्याकडे हे प्रकल्प का येत नाही ? गुजरातला हे प्रकल्प का जात आहे ? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प गुजरातला जाण्यावरून हल्लाबोल केला आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पही गुजरातला गेला तेव्हा आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला धारेवर धरत हल्लाबोल केला होता, आज पुन्हा एक प्रकल्प गुजरातला गेल्याचे समजताच आदित्य यांनी मी हे आधीच सांगत होतो असा दावा केला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वेदांता-फॉक्सकॉन गेल्यावर महाविकास आघाडीने भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली होती.
तरुणांना मिळणारा रोजगार गेल्याने महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यावरू सत्ताधारी पक्षाने मात्र प्रकल्प महाविकास आघाडी सरकारमुळे गेल्याचा दावा केला होता.
आताही एयरबसचा प्रकल्प गुजरातला गेल्याची माहिती समोर येत असल्याने शिंदे गटासह भाजपवर महाविकास आघाडीकडून जोरदार टीका होण्याची शक्यता आहे.
एकूणच राज्यातील सरकार बदल्यानंतर गुजरातला प्रकल्प ला निश्चित होत असल्याने आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांनी या दरम्यान एक सल्ला ही दिला आहे, दिल्लीत जाऊन विचारा आमच्याकडे प्रकल्प का येत नाही.
एकूणच उदय सामंत यांच्या खात्याशी हा विषय असल्याने आदित्य ठाकरे यांनी सामंत यांना सल्ला देत डिवचले आहेत.
येत्या काळात या प्रकल्पावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा नवा सामना सुरू होणार असून दावे-प्रतिदावे बघायला मिळणार आहे.