“चला, अखेर मंत्रिमंडळाच्या…”, आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारचं अशा पद्धतीने अभिनंदन

राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षात बरीच राजकीय गणित पाहायला मिळाली. आता शिंदे फडणवीस सरकारला अजित पवार यांची साथ मिळाली आहे. तसेच मंत्रिमंडळात स्थानही मिळालं आहे.

चला, अखेर मंत्रिमंडळाच्या..., आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारचं अशा पद्धतीने अभिनंदन
"खरी किंमत काय आहे...", आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 5:14 PM

मुंबई : राज्यात शिवसेना भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं आहे. शिवसेना भाजपा सरकारला अजित पवार यांची साथ मिळाल्यानंतर मंत्रिमंडळात स्थानही मिळालं आहे. तसेच खातेवाटपात महत्त्वाची खातंही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाली आहेत. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. उबाठा गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांवर बोचरी टीका केली आहे. अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्वीट करून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे

“चला, अखेर मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर 13 दिवसांनी खाते वाटप झालं…पहिले 20, नंतर 9 असा विस्तार झाला. आता ह्या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत! त्यांची खरी किंमत काय आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे-भाजपा ने 33 देशांना दाखवून दिलंय! अभिनंदन!”, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात खातेवाटप झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आहेत. इतर शिवसेनेच्या मंत्र्यांकडे कोणती खाती आहेत जाणून घ्या.

शिवसेनेच्या मंत्र्यांकडे कोणती खाती?

  • गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
  • दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
  • संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
  • उदय रविंद्र सामंत- उद्योग
  • प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  • अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
  • दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा

संजय राऊत काय म्हणाले?

खातेवाटपात अजित पवार यांना पुन्हा एकदा अर्थमंत्रालय मिळाल्याने संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. शिंदे गटाकडील मदत आणि पुनवर्सन, कृषी खातंही हिसकावून घेतल्याची बोचरी टीका केली. इतकंच काय तर खातेवाटपापूर्वी शिंदे गटाने काय मागणी केली होती याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.

“दिल्लीत जाऊन अजित पवार यांनी अर्थमंत्रिपद देऊ नका असं सांगितलं. अर्थ खातं अजित पवार यांना द्यायचं नसेल तर अर्थ खातं तुमच्याकडे ठेवा आणि मुख्यमंत्रीपद अजितदादांना द्या, असा प्रस्ताव दिल्लीने शिंदे गटासमोर ठेवला होता. त्या सूचनेनंतर शिंदे गट मागे आला.”, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.