मेळघाटातला आदिवासी बांधवांचा घुंगरु बाजार, स्वतंत्र परंपरा आणि संस्कृती जतन करण्याचा निर्धार

दिवाळी नंतरचा घुंगरु बाजार हा सर्वात मोठा म्हणून आदिवासी बांधव साजरा करतात.

मेळघाटातला आदिवासी बांधवांचा घुंगरु बाजार, स्वतंत्र परंपरा आणि संस्कृती जतन करण्याचा निर्धार
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 9:01 AM

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात फार पूर्वीपासून कोरकू, गोंड, भिलाल या आदिवासी जमाती वास्तव्य करीत आहेत. दिवाळी नंतरचा घुंगरु बाजार हा सर्वात मोठा सण साजरा करताना हे आदिवासी बांधव पायात घुंगरु बांधून बासरी व ढोलकीच्या तालावर प्रत्येक आठवडी बाजारात जाऊन नृत्य करुन दीपोत्सवाचे स्वागत करतात. मेळघाटातील धारणी येथे यंदाचा घुंगरु बाजार भरला होता. (Adivasi CommunityAmravati Melghat ghungru bajar)

आदिवासी समाजातील पुरुष मंडळी विशेष पोषाखात घुंगरु बाजारात येतात. पांढरा सदरा, पांढरी धोती, काळा कोट, डोक्यावर काळा चष्मा, हाता काठी, बांसरी आणि डोक्यावर तुरेदार पगडी हा विशेष आकर्षण ठरतो. त्याचेसोबत ढोल, टिमका, आणि बासुरीसह म्हशीचा सिंगाचा वाजणारी पुंगी व सर्वांनी मिळून लयबद्ध केलेले गोंडी नृत्य करतात.

गोंडी नृत्य करताना त्यांच्यात दोन लोकांजवळ कापडाची झोळी घेऊन बक्षीस मागणारे असतात. वर्षभर जनावरे चारल्यामुळे वर्षातून एकदा आपला हक्काने बक्षिसांचा स्वीकार करतात. यात रोख रकमेसह जे काही दुकानातील सामान दिले जाते, त्याचा स्वीकार प्रेमाने केला जातो.

पुढील आठ दिवस घुंगरु बाजाराचा आनंदोत्सव पहावयास मिळणार आहे, सातपुड्याच्या शेवटचे टोक म्हणजे मेळघाट. 70 टक्क्यांहून अधिक वन असलेल्या मेळघाटात पुरातन काळापासून आदिवासींच्या विविध जमाती वास्तव्यास आहे. शहरी संस्कृतीपासून लांब राहणाऱ्या या आदिवासी बांधवांनी आपली स्वतंत्र परंपरा व संस्कृती जतन केली आहे.

“वर्षातून एकदाच येणाऱ्या या सणाला आम्ही सर्वजण जमतो. आम्हाला या सणाची उत्सुकता लागून असते. या सणाची आणखीही आदिवासी मंडळी वाट पाहत असतात. मोठ्या उत्साहाने आम्ही हा सण साजरा करतो. आम्हा आदिवासी बांधवांची संस्कृती टिकून राहावी असं आम्हाला वाटतं”, अशा भावना आदिवासी बांधवांनी व्यक्त केल्या.

(Adivasi CommunityAmravati Melghat ghungru bajar)

संबंधित बातम्या

शाळांना कोरोनाचं ग्रहण, अमरावतीत 22 शिक्षकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

अमरावती शिक्षक मतदारसंघ स्पेशल रिपोर्ट : पक्ष की बहीण? भाजप नेत्यासमोर द्विधा, लढत चौरंगी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.