सोलापूर : अॅड. गुणरत्न सदावर्ते हे भाजपचे दलाल आहेत असा गंभीर आरोप कॉँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे. काकासाहेब कुलकर्णी यांनी सोलापूरमध्ये हे आरोप केले असून सडकून टीका सदावर्ते यांच्यावर केली आहे. याच दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकार यांच्याबद्दल केलेल्या भाजप नेत्यांच्या विधानावर सदावर्ते यांनी कोणतेही आंदोलन केले नाही. महापुरुषांबद्दल कोणी चुकीचे वक्तव्य केल्यास त्याला सर्वांनी विरोध केला पाहिजे. पण सदावर्ते तशी भूमिका घेत नाही. सदवार्ते हे भाजपचे दलाल आहेत, ते सोयीनुसार भूमिका घेतात. आणि जर तसे नसेल तर सदावर्ते यांनी दोन दिवसात चंद्रकांत पाटलांविरोधात कोर्टात रिट पिटीशन दाखल करावी असं थेट खुलं आव्हान कुलकर्णी यांनी दिले आहे. त्यामुळे सदावर्ते आणि कॉँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांच्यात येत्या काळात नवा सामना रंगण्याची शक्यता आहे.
कॉँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी भाजपचे दलाल असल्याचा आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर केला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका करत असतांना महापुरुषांच्या बद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप नेत्यांवर सदावर्ते का बोलत नाही म्हणून सवाल उपस्थित केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांच्या बद्दल जे विधान केले त्यावरून कोर्टात रिट पिटीशन दाखल करावी असं आवाहनही कुलकर्णी यांनी सदावर्ते यांना दिलं आहे.
गेल्या काही दिवसांत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटावर सडकून टीका करत ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केलेत.
त्यामुळे सदावर्ते आणि भाजप यांची जवळीक पाहता कॉँग्रेस प्रदेश प्रवक्ते यांनी सडकून टीका करत थेट सदावर्ते यांना दलालचं म्हंटलं आहे.
काकासाहेब कुलकर्णी यांनी यांनी केलेल्या आरोपावर अॅड. गुणरत्न सदावर्ते काय प्रतिक्रिया देतात ? की कुलकर्णी यांचं आव्हान स्वीकारतात हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.