उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित संभाजी ब्रिगेडचा पहिला मेळावा कुठं होणार? मराठा महासंघाने दिलं उद्धव ठाकरेंना निमंत्रण

शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर आमदारानंतर खासदार शिंदे गटात जात असतांना दुसरींकडे संभाजी ब्रिगेड यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली होती, त्यानंतर पहिल्यांदाच मोठा मेळावा होणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित संभाजी ब्रिगेडचा पहिला मेळावा कुठं होणार? मराठा महासंघाने दिलं उद्धव ठाकरेंना निमंत्रण
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 9:54 AM

पुणे : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती केली आहे. यामध्ये संभाजी ब्रिगेड सोबत युती केल्यानंतर राज्यात कुठेही एकत्रित कार्यक्रम झाला नव्हता. मात्र, आता दोन्ही पक्षांनी एकत्रित मेळावा घेण्याचे ठरविले आहे. 11 जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंदखेडराजा येथे मोठ्या दिमाखात जिजाऊ जन्मोत्सव आयोजित केला जातो. याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेसह संभाजी ब्रिगेडचे नेते, पदाधिकारी उपस्थित असणार आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, अरविंद सावंत आणि अंबादास हे उपस्थित राहणार आहे. याबाबत मराठा महासंघाकडून याबाबतचे खास निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे हे उपस्थित राहतात का? याकडे लक्ष लागून आहे.

शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरुन पाय उतार व्हावे लागले. त्यानंतर शिवसेनेतून आमदार, खासदार फुटून शिवसेनेचा दूसरा गट निर्माण झाला.

त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे यांना अनेक शिलेदार सोडून जात असतांना संभाजी ब्रिगेडने उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली आहे.

हे सुद्धा वाचा

11 जानेवारीला सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे, त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे.

ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, अरविंद सावंत आणि अंबादास दानवे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाची युती झाल्यानंतर पहिलाच मोठा मेळावा होणार असल्याने जय्यत तयारी सिंदखेडराजा येथे सुरू आहे.

मराठा महासंघाकडून उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आले असून उद्धव ठाकरे यांची उपस्थिती राहणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.