भाजपा नेते नितेश राणे यांच्या आवाहनानंतर राज्यात प्रथमच वराह स्वामी जयंती साजरी

भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी हिंदू समाजाने वराह जयंती साजरी करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात वराह जयंती साजरी झाल्याचे वृत्त आहे.

भाजपा नेते नितेश राणे यांच्या आवाहनानंतर राज्यात प्रथमच वराह स्वामी जयंती साजरी
वराह जयंती साजरी
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 8:15 PM

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी सकल हिंदूचे मोर्चे काढून सतत वादग्रस्त विधाने केल्याने ते कायम चर्चेत राहीले आहेत. त्यांनी राज्यभरात 7 सप्टेंबरला वराह जयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. राज्यभरात प्रथमच हिंदू बांधवांनी काल वराह जयंती साजरी केल्याची माहिती आहे. त्यामुळे वराह जयंतीवरुन राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. राज्यात नगर, पुणे, कात्रज, कोंढवा तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी ठिकाणी काल वराह जयंती साजरी करण्यात आली आहे.

varaha jayanti 2024

महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लीम धर्मियाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर नितेश राणे यांनी त्यांची भेट घेत त्यांना पाठींबा जाहीर केला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी भगवान विष्णूचा अवतार असलेल्या वराह जयंतीचा उत्सव हिंदू बांधवांनी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात नितेश राणे यांच्या आवाहनानंतर वराह जयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आली आहे.

राज्यभरात पहिल्यांदाच हिंदु बांधवांकडून सर्वदुर वराह जयंती साजरी करण्यात आल्याची माहीती आहे. वराह जंयतीवरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. हिंदू धर्मात वराह जयंतीला एक वेगळं महत्त्व असून विष्णूचा तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार म्हटला जातो. मात्र मुस्लिम समाजात वराह प्राण्याबद्दल बोलणंही पाप मानलं जातं. या संदर्भात मुस्लिम संघटनांकडून नितेश राणे यांचा निषेध नोंदवण्याचे प्रमाण वाढले आहे. 7 सप्टेंबरला कुटुंबासहित गावागावात वराह जयंती साजरी करण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले होते.

आहिल्यादेवी नगर , पुण्यातील कात्रज – कोंढवा परिसर तसेच कोल्हापुर – सातारा – सांगली – सोलापुर अशा विविध ठिकाणी हिंदू बांधवांनी वराह जयंती साजरी केली असून तिला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. हिंदुंचा गब्बर म्हणून नितेश राणे यांची प्रतिमा होत असतानाच त्यांच्या वादग्रस्त आवाहनालाही राज्यभरात मिळालेला जोरदार प्रतिसाद पाहाता भाजपात आता नितेश राणे यांना आमदारकीचे तिकीट पक्के झाल्याचे म्हटले जात आहे.

varaha jayanti celebrated

नितेश राणे यांना महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीकडून देखील जोरदार विरोध होतो आहे. विरोधी पक्षातील एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी नितेश राणे स्वत: बॉडीगार्ड घेऊन फिरतात तर ते दुसऱ्यांचे काय संरक्षण करणार अशी टिका केली होती. यातच आता भाजपच्या हाजी अराफत यांनी देखील नितेश राणे यांच्यावर टीका केली तरीही नितेश राणे काही केल्या थांबत नसल्याने त्यांचा बोलवता धनी नेमका कोण आहे ? असे म्हटले जात आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.