दाराला कुलूप, पोलिसांची नोटीस, जेलमधून सुटल्यावर अनिक्षा जयसिंघानी कुठे गेली?
अमृता फडणवीस यांच्याशी भेटीगाठी वाढल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानी ही आणखी काय खुलासा करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र जामीन मिळाल्यानंतर अनिक्षा अचानक अज्ञातस्थळी रवाना झाल्याचं दिसून येतंय.
निनाद करमरकर, उल्हासनगर, ठाणे : अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या ब्लॅकमेलिंग प्रकरणातील महत्त्वाची आरोपी अनिक्षा (Aniksha) जयसिंघानी नेमकी कुठे गेली आहे, यावरून चर्चा सुरु झाली आहे. अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) यांना सोमवारी कोर्टासमोर हजर करण्यात आलं. अनिक्षा हिला जामीन मंजूर करण्यात आला तर अनिल जयसिंघानी याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तर मंगळवारी अनिक्षा हिची भायखळा जेलमधून सुटका झाली. मात्र जेलमधून सुटल्यावर अनिक्षा जयसिंघानी उल्हासनगर येथील तिच्या घरी गेली नसल्याचं आढळून आलंय. उल्हासनगर येथील तिच्या घराला कुलूप
अनिक्षा जयसिंघानी अज्ञातस्थळी रवाना?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच देणे आणि ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांनी केल्याचा आरोप आहे. १६ मार्च रोजी अनिक्षा जयसिंघानीला या प्रकरणात क्राइम ब्रांच पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात अनिल जयसिंघानी प्रमुख आरोपी असल्याचा युक्तिवाद कोर्टासमोर करण्यात आला. त्यामुळे दिसून येतंय. माध्यमांपासून लपण्यासाठी अनिक्षाने घरी येणं टाळलंय की काय असा संशय येतोय.
Mumbai: Accused Aniksha Jaisinghani, arrested by Mumbai Crime Branch for allegedly threatening and blackmailing Amruta Fadnavis, wife of Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis, was released from Byculla jail after she was granted bail yesterday. pic.twitter.com/j5TGM9GlOb
— ANI (@ANI) March 28, 2023
अनिल जयसिंघानी याचा जामीन अर्ज मंगळवारी फेटाळण्यात आला. मंगळवारी अनिक्षा जयसिंघानी हिची भायखळा जेलमधून सुटका करण्यात आली. त्यानंतर अनिक्षा डीबी मार्ग पोलीस ठाण्यातून रवाना झाली. मात्र तिला ज्या घरातून अटक करण्यात आली होती, त्या उल्हासनगरच्या घरी ती आलेलीच नाही. या घराला कुलूप लागलेलं असून दारावर अनिल जयसिंघानीच्या नावाने पोलिसांची नोटीस लावलेली आहे. अनिक्षा माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी अज्ञातस्थळी रवाना झाल्याची शक्यता आहे.
कोर्टात पुन्हा कधी सुनावणी?
मध्य प्रदेशात अनिल जयसिंघानी याच्यावर दाखल करण्यात आलेल्या अन्य एका प्रकरणात पोलिसांनी मुंबई कोर्टातून अनिल जयसिंघानी याची ट्रांझिट रिमांग मागितली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होईल. तर अनिल जयसिंघानी याच्या जामीन अर्जावर ३१ मार्च रोजी सुनावणी करण्यात येईल. तर अनिल जयसिंघानी याच्यासोबत पकडलेला आणखी एक सहआरोपी निर्मल जयसिंघानी हादेखील न्यायालयीन कोठडीत आहे.