आता कुणी चुकलं तर आम्ही ठोकणारच… संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्टच सुनावलं, कोश्यारी यांना…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केला आहे.
नाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsing koshyari ) यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. महापुरुषांच्या बद्दल त्यांनी विधान केले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपशब्द वापरुन अवमान केला होता. तेव्हाच संपूर्ण महाराष्ट्र ( Maharashtra News ) गदारोळ झाला होता,. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली होती. त्यावरून राज्यपाल हटाव ही मोहीमही सुरू झाली होती. तोच मुद्दा हेरून संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपाल यांचा राजीनामा हा उशिरा सुचलेले शहाणपण आहे असा टोला लगावला आहे.
राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांचा राजीनामा दोन महिन्यापूर्वीच घ्यायला पाहिजे होता. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा त्यांनी अवमान केला होता, कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची घडी त्यांनी मोडली होती.
रमेश बैस हे नवे राज्यपाल असणार आहे, त्या नव्या राज्यपाल यांना शुभेच्छा आहे. महाराष्ट्राला वेगळा इतिहास आहे, महापुरुषांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्य चालतं आहे त्यामुळे त्याबाबत नव्या राज्यपाल यांना माहिती असायला हवी.
जुन्या राज्यपाल यांनी ज्या चुका झाल्या त्या चुका नव्या राज्यपाल यांनी करू नये, महाराष्ट्राच्या बद्दल दुसरीकडे माहिती द्यावी, महाराष्ट्रात असलेल्या महापुरुषांचा इतिहास दुसरीकडे प्रसारित करायला पाहिजे.
राज्यपाल यांचा राजीनामा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना सांगितलं तेव्हा का निर्णय घेतला नाही, महाराष्ट्रात किती गदारोळ झाला तरी राजीनामा घेतला नाही, त्यांना कोणी पाठीशी घातले आहे सर्वांना माहिती आहे असं संभाजीराजे म्हणाले.
यापुढील काळात जर काही चुका झाल्या तर आम्ही ठोकनार, स्वराज्याच्या माध्यमातून आम्ही ठोकणार असं म्हणत संभाजीराजे यांनी निशाणा साधला, मात्र, हा निशाणा भाजपवर होता की आणखी कुणावर याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यपाल हे घटनात्मक पद म्हणून आम्हाला मर्यादा येतात, मात्र स्वराज्याच्या माध्यमातून आम्ही ते बरोबर करू असेही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हणत येणारी बंधने सांगितली आहे. यापूर्वी स्वराज्य संघटनेच्या वतिने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाला होता.
तर राज्यपाल यांना राज्यपाल पदावरून हटवा अशी मागणी करत संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका मांडत जोरदार टीका केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर आता संभाजीराजे यांनी नव्या येणाऱ्या राज्यापालांनाही इशारा दिला आहे.