वादग्रस्त विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया, संभाजीराजे हे स्वराज्यरक्षक होते, म्हणजेच ते… काय म्हणाले आव्हाड…

औरंगजेब बद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पहिली प्रतिक्रिया देत असतांना भाजपला काही सवाल करत संभाजीराजे स्वराज्यरक्षक कि धर्मवीर याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

वादग्रस्त विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया, संभाजीराजे हे स्वराज्यरक्षक होते, म्हणजेच ते... काय म्हणाले आव्हाड...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 8:11 PM

ठाणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी त्यांनी काही संदर्भ देत असतांना औरंगजेब कृत आणि हिंदू द्वेष्टा नव्हता असं म्हंटलं होत. त्यानंतर संपूर्ण राज्यात आव्हाड यांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले कोणीही काही आंदोलन करू द्या, मी माझ्या प्रश्नावरती ठाम आहे. मी माझी जे वक्तव्य केले त्यावर ठाम आहे. मी जो प्रश्न विचारला तो तुम्ही फिरवलात, तुम्ही माझा बाइट तोडून दाखवला, पूर्ण दाखवला नाहीत, औरंगजेब हा क्रूर होता. त्याने आईला मारलं, बापाला मारलं असं म्हणत आव्हाड यांनी सारवासारव केली आहे. औरंगजेबसमोर महाराष्ट्र झुकला नाही शिवाजी महाराज झुकले नाही, संभाजी महाराज झुकले नाहीत असं आव्हाड यांनी म्हंटलं आहे.

आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत असतांना शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं त्याचं रक्षण मरेपर्यंत संभाजी महाराजांनी केलं म्हणून ते स्वराज्य रक्षक होतेच असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटलं आहे.

पण एका धर्माचं नाव जोडून त्यांना धर्मवीर म्हणणं काही कारण नाही, त्याचा कुठलाही ऐतिहासिक उल्लेख देखील नाही असाही दावा आव्हाड यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

तसा उल्लेख असता तर मग संभाजी राजांना सावरकरांनी आणि गुळवेलकरांनी स्त्री लंपट आणि दारुड्या असं म्हणण्याचं कारणच नव्हतं आणि हा दाखला मी देत नाही स्वतःच्या पुस्तकात त्यांनीच लिहिलेला आहे.

आपल्या अंगावर आला की दुसऱ्याकडे ढकलून द्यायचं हे नेहमीच असतं, मी आजही म्हणतो औरंगजेब क्रूर होता त्यांनी संभाजी महाराजांना मारलं, पण शंभूराजांनी धर्माचा कोणता प्रसार केला आणि त्याच्यासाठी मृत्यू पत्करला हे मला मान्य नाही.

शंभू महाराज एवढे महान होते तर गुळवळकर आणि सावरकरांनी हे लिहिण्याचे कारण काय? हे उत्तर भाजपाच्या लोकांनी द्यावं व मग आम्हाला प्रश्न विचारावेत असा सवालही आव्हाड यांनी केला आहे.

आज आम्ही म्हणतो ते स्वराज्यरक्षक होते म्हणजेच ते धर्मवीर होते, स्वराज्यामध्ये धर्म असतो आणि त्या धर्माचे रक्षण करण्याकरिता म्हणून शंभू महाराज व शिवाजी महाराज हे झगडले.

हो ताटमानाने औरंगजेब महाराष्ट्रात आला होता दक्षिणेत जाण्याचा प्रयत्न करत होता त्याला इथेच रोखण्याचा काम या साम्राज्यांनी केलं या रयतेने केलं.

शिवाजी महाराज यांचे राज्य भोसले यांचे राज्य समजत नाही त्याला रयतेचा राज्य म्हणतात महाराष्ट्राने महाराष्ट्र धर्म पाळाला, मराठा धर्म पाळला. मराठा धर्म म्हणजे मराठा नाही मराठा ही त्याकाळी व्यापक संकल्पना होती त्याच सगळ्यांचा समावेश होता.

त्यामुळे शंभूराजे हे स्वराज्य रक्षक होते म्हणजेच धर्मवीर पण होते पण ते स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर असं नाही अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.