उजनी धरणात मांगूरनंतर आता घातक “सकर” माशाची भर, मच्छीमारही हैराण
आता अजून एका उपद्रवी आणि विद्रूप अशा "सकर" या माशामुळे नवीन संकट उजनी धरणावर घोंगावत आहे.
इंदापूर : मानवी आरोग्यास आणि पर्यावरणाला धोका पोहोचवणारा तसेच हरित लवादाने बंदी घातलेला मांगूर मासा नष्ट करण्यासाठी राज्य शासन मोहिमा हाती घेत आहे. आता अजून एका उपद्रवी आणि विद्रूप अशा “सकर” या माशामुळे नवीन संकट उजनी धरणावर घोंगावत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग आणि मच्छीमार मोठ्या चिंतेत सापडलेत.
आता सकर या माशामुळे नवीन संकट
उजनी धरणातील मांगूर मासा कसा नष्ट करायचा या चिंतेत असताना आता सकर या माशामुळे नवीन संकट आलेय. हा मासा मोठ्या प्रमाणात उजनीत सापडू लागल्याने इतर माशांच्या प्रजाती धोक्यात तर आल्यात, शिवाय मच्छीमारांच्या जाळ्यांचेही अतोनात नुकसान होऊ लागल्याने मच्छीमारही सध्या हैराण झालेत.
या माशाची ओळख फिश टॅंकमधील शोभिवंत मासा
मुळात तर या माशाची ओळख फिश टॅंकमधील शोभिवंत मासा म्हणून होती. मात्र फिश टॅंकमध्ये अनेक शोभिवंत माशांनी प्रवेश केल्यानंतर व पाळणाऱ्यांची हौस फिटल्यानंतर हा मासा खाडीत, नदीत सोडून देण्यास सुरुवात झाली. हा मासा मूळचा अमेरिकेतला असल्याचे अभ्यासक सांगतात. आता मुंबई खाडीत आणि वाराणसीच्या गंगा नदीत हा मासा आढळून आला होता, तेव्हापासूनच मत्स्य अभ्यासकांनी धोक्याची सूचना दिली होती. मात्र या धोकादायक माशाने आता राज्यातील सर्वात मोठे उजनी पाणलोट क्षेत्र व्यापून टाकले आहे.
सकर मासा मांसाहारी असल्याने तो इतर माशांना व त्यांची अंडी खाण्यात तरबेज
विशेष म्हणजे हा मासा मांसाहारी असल्याने तो इतर माशांना व त्यांची अंडी खाण्यात तरबेज असतो. हा मासा टणक असल्याने इतर माशांपासून हा सकर मासा सुरक्षित राहतो. साहजिकच त्याची संख्यावाढ जलदगतीने होते. असा हा सकर मासा उजनीत थोड्या संख्येने नव्हे, तर मोठ्या संख्येने आढळून येऊ लागला आहे. मच्छीमारांच्या जाळ्यात हा मासा अडकल्यानंतर तो सहजासहजी जाळ्यातून निघत नाही, त्यास काटे खूप असतात, त्यासाठी जाळी फाडवी लागत आहेत. त्यामुळे जाळ्यांचे मोठे नुकसान सध्या होताना दिसत आहे. शिवाय बाजारपेठेत या माशाला मागणी नसते. सध्या शेकडोंच्या संख्येने हा मासा उजनीत सापडू लागल्याने मच्छीमारांच्या चिंतेत भर पडली आहे.
उजनी धरणात हजारो मच्छीमार रोज मासेमारी करतात
उजनी धरणात हजारो मच्छीमार रोज मासेमारी करत असतात, इंदापूर शहरात आणि इंदापूर तालुक्यातील भिगवण या भागात राज्यातील प्रसिद्ध असे मासळी बाजार पेठ आहे, उजनी धरणात मासेमारी करत असताना मच्छीमारांच्या जाळ्यात रोज शेकडो किलो हा मांगूर मासा तर सापडतोच पण आता त्याबरोबर सकर हाही मासा सापडू लागल्यानं मच्छीमार तसेच अडते व्यापारीही अडचणीत येत आहेत. सकरसारखे धोकादायक आणि घातक माशे उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे मत्स्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी यावरती तात्काळ बैठक घेऊन उजनीतील मांगूर आणि सकर मासा कसा नष्ट करायचा यावरती उपाययोजना करणे गरजेचे आहे.
संबंधित बातम्या
मावळमधील इंद्रायणी भाताची हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त, धबधब्यांमधील दगडधोंडे खाचरात
बॅग भरुन कपडे आणा, राज ठाकरेंचे मुंबईतील पदाधिकाऱ्यांना आदेश, ठाण्यावरुन आजच पुण्याला निघणार
After Mangur in Ujani dam, now full of deadly “sucker” fish, fishermen are also harassed