सर्वात मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी आणखी एक नवीन योजना; आता काय मिळणार?
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. याचदरम्यान आता महिलांसाठी आणखी एक नवीन योजना आणण्यात येत आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. या योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केरत योजनेचा लाभही घेतला. सरकारच्या या योजनेचे बरेच कौतुक होत असून महायुतीतील प्रत्येक पक्ष या योजनेचे श्रेय लाटताना दिसत आहे. मात्र यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असून करदात्यांच्या पैशातूनच या योजनेचे पैसे देत असल्याते सांगत विरोधकांनी या योजनेववर टीका केली होती. महिलांना अशा प्रकारे पैसे देण्याऐवजी त्यांच्या हाताला काम द्या अशी मागणीही विरोधकांनी केली. मात्र महायुती सरकारने त्यांच्या टीकेला भाक न घालता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गाजावाज कायम ठेवला आहे.
याचदरम्यान आता महिलांसाठी आणखी एक नवीन योजना आणण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘लाडकी बहिण’ योजनेनंतर आता भाजप नेते, डोंबिवलीकर आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ‘सक्षम भगिनी’ उपक्रमाची सुरुवात केली आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी या उपक्रमातून बचत गटांच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. या भव्य उपक्रमात सुमारे पाच हजाराहून अधिक महिलांनी सहभाग घेतला आहे.
‘सक्षम भगिनी’ उपक्रमाची सुरुवात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहिण’ योजना राबवून महिलांना आर्थिक पाठबळ दिल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ‘सक्षम भगिनी’ उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देणे आहे. डोंबिवलीतील महिलांच्या बचत गटांना विना भांडवल उत्पादनाची संधी मिळवून देत, त्यांच्या उत्पादनांमधून त्यांना उत्पन्नाची सोय केली जाणार आहे. नवरात्रीच्या निमित्ताने या उपक्रमाचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांनी केले, त्यामध्ये पाच हजाराहून अधिक महिलांचा सहभाग होता.
या उपक्रमांतर्गत, शहरातील निरनिराळ्या शाखांच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेले पदार्थ आणि वस्तू ऑर्डरनुसार वितरकांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. त्यामुळे महिलांना घरीच वस्तू तयार करण्याची आणि कोणताही त्रास न घेता उत्पन्न मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात स्वावलंबी बनवण्यास मदत होईल, असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले.
लाडक्या बहीण योजनेनंतर आता सक्षम बहिणी उपक्रमाचा काय परिणाम होतो, महिला मतदारांना हा उपक्रम कसा वाटतो, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.