अर्थ खात्यावर ताबा घेतल्यानंतर आता सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी, याच अधिवेशनात होणार निर्णय? उमेदवार कोण?

विधानपरिषद सभागृहात एकूण 78 संख्याबळ आहे. त्यात राज्यपाल नियुक्त 12 आणि स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडून येणाऱ्या 9 अशा एकूण 21 जागा रिक्त आहेत. तर, भाजप 22, शिवसेना 11, राष्ट्रवादी काँग्रेस 9, काँग्रेस 9, जनता दल 1, शेकाप 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, अपक्ष 4 असे संख्याबळ आहे.

अर्थ खात्यावर ताबा घेतल्यानंतर आता सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी, याच अधिवेशनात होणार निर्णय? उमेदवार कोण?
DCM AJIT PAWAR, MLC RAMRAJE NAIK NIMBALKAR AND RAM SHINDEImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 17, 2023 | 6:26 PM

मुंबई । 17 जुलै 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्याचवेळी अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते यांच्याकडे जाणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र, शिंदे गट आणि भाजप अजित पवार यांना अर्थ खाते देण्यात तयार नसल्याचे सांगितले जात होते. अजित पवार यांनी थेट दिल्लीत अमित शाहा यांची भेट घेतली. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केले आणि अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांना अर्थ खाते मिळाले. त्याचसोबत राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्यांना महत्वाची खाती मिळविण्यातही अजित पवार यशस्वी ठरले. त्यापाठोपाठ आता विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

शिवसेनेच्या 11 आमदारांपैकी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुनील शिंदे, सचिन अहिर, अनिल परब, आमशा पाडवी, विलास पोतनीस हे उद्धव ठाकरे गटात आहेत. तर, उपसभापती नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, विप्लव बाजोरिया या तीन आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीच्या 9 आमदारांपैकी शशिकांत शिंदे, अरुण लाड, एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्यासोबत कायम आहेत. विक्रम काळे, अनिकेत तटकरे, अमोल मिटकरी, सतीश चव्हाण, रामराजे निंबाळकर हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. तर बाबाजानी दुराणी यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही.

भाजपचे विधानपरिषदेत सर्वाधिक 22 आमदार आहेत. मात्र, पूर्वी विरोधकांची संख्या 32 इतकी होत असल्यामुळे भाजप आणि शिंदे गट सभापतीपदाची निवडणूक घेण्यास धजावत नव्हते. मात्र, आता सत्ताधारी पक्षाकडे भाजप 22, शिवसेना ( शिंदे गट ) 3, अजित पवार गट 6, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर असे एकूण 32 इतके संख्याबळ झाले आहे.

त्याउलट विरोधी पक्षांची स्थिती झाली आहे. काँग्रेस 9, उद्धव ठाकरे गट 7, राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) 3, जनता दलाचे कपिल पाटील, शेकापचे जयंत पाटील, अपक्ष आमदार सुधाकर अडबाले, किशोर दराडे असे एकूण 23 आमदार आहेत. तर, विधान परिषद निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेले सत्यजित तांबे आणि किरण सरनाईक या दोन आमदारांची भूमिक अदयाप निश्चित नाही.

विधानपरिषदेत सभापती पद रिक्त आहे. मात्र, पूर्वीच्या तुलनेत सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ वाढल्याने याच अधिवेशनात सभापतीपदाच्या निवडणूक घेण्यात येणार आहे अशी माहिती विधानभवनातील सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, भाजपचे भाई गिरकर आणि फडणवीस यांचे विश्वासू राम शिंदे यांच्या नावाची या पदासाठी चर्चा आहे.

शरद पवार यांचे निकटचे सहकारी मानले जाणारे रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांची साथ दिली. तसेच, अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरही रामराजे यांनी तीनवेळा भेट घेऊन सभापतीपद मिळावे अशी मागणी केली. अजित पवार यांनी त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून भाजपकडे रामराजे नाईक निंबाळकर यांना सभापतीपद मिळावे यासाठी गळ घालणार आहेत. याबाबत लवकरच निर्णय होऊन या सत्राच्या दुसऱ्या आठवड्यात सभापतीपदाची निवडणूक घेण्याची शक्यता आहे असेही या सूत्रांनी सांगितले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.