अफजल खान वधाच्या देखाव्याचा वाद पेटणार? देखाव्याला परवानगी मिळवण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील मुख्यमंत्र्यांना भेटणार

मुंबईमध्ये दहिहंडीच्या उत्सवात गोविंदांनी अफझल खानाचा वध हा देखावा सादर केला होता. मात्र, पुण्यात या देखाव्याला परवानगी नाकारल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संगम तरुण मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सवस मंडळ यंदा 56 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

अफजल खान वधाच्या देखाव्याचा वाद पेटणार? देखाव्याला परवानगी मिळवण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील मुख्यमंत्र्यांना भेटणार
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 5:57 PM

पुणे : पुण्यात आता गणेशोत्सवातील देखाव्यावरुन सुरु झालेला वाद आणखी पेटणार आहे. पुण्यातील गणेशोत्सवात अफजलखानाच्या देखाव्यावरून वाद सुरू झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे पुणे पोलिसांनी अफजलखान वध या विषयावरील जिवंत देखावा दाखविण्यास परवानगी नाकारली आहे. मात्र, पोलिसांचा विरोध झुगारून संगम तरुण गणेशोत्सव मंडळ देखावा साकारण्यावर ठाम आहे, त्यामुळे पुणे पोलीस आणि गणेशोत्सव मंडळ यांच्यात नवा वाद सुरू झालाय. देखाव्याला परवानगी मिळवण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटणार आहे.

अफजल खानाच्या वधाचा देखावा दाखवायला पुण पोलिसांनी संगम तरुण मंडळाला परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाचे कारण पुढे करत पोलिसांनी अफजल खानाच्या वधाचा देखावा करण्यास मनाई केली आहे. मात्र अफजल खान हा काही चांगला व्यक्ती नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही असं हा देखावा सादर करणाऱ्या मंडळाचे म्हणणे आहे. संगम तरुण मंडळाचे कार्यअध्यक्ष संजय काळे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे. पुण्यातील मनसे आमदार राजू पाटील हे देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे काळे यांनी सांगीतले. आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल मात्र आम्ही देखावा नक्की धाखवू असा निर्धारच या मंडळाने केला आहे.

या ना त्या कारणाने अफजलखानाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण कायमच तापलेलं पाहायला मिळतंय.आता गणेशोत्सवातील अफजलखानाच्या देखाव्यावरून पुण्यात वाद पेटलाय. कोथरूड येथील संगम तरुण मंडळाकडून यंदा अफजलखानाच्या वधाचा जिवंत देखावा साकरला जाणार आहे, मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, म्हणून या देखव्याला कोथरूड पोलिसांनी परवानगी नाकारलीय.

मुंबईमध्ये दहिहंडीच्या उत्सवात गोविंदांनी अफझल खानाचा वध हा देखावा सादर केला होता. मात्र, पुण्यात या देखाव्याला परवानगी नाकारल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संगम तरुण मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सवस मंडळ यंदा 56 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

याप्रकरणी मंडळाकडून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून दाद मागितली आहे. हिंदुत्त्वाच्या अजेंड्यावर आलेलं शिंदे सरकार आम्हाला नक्कीच परवानगी देणार असा विश्वास मंडळाचे पदाधिकारी व्यक्त करतायत. या मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना, प्रसंगावर आधारीत देखावा सादर केला जातो. यावेळी मात्र परवानगी नाकारल्याने मंडळाचे सदस्य आक्रमक झाले आहेत, त्यामुळे गणेशोत्सवात देखाव्यावरून पुणे पोलिस आणि गणेश मंडळं यांच्यात वाद पाहायला मिळणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.