Hijab : वाद कर्नाटकात तर मोर्चे महाराष्ट्रात का? सवाल विचारणाऱ्यांसाठी कुठे कुठे झाले आंदोलनं? पहा एका क्लिकवर?
हिजाबचा (Hijab) वाद सध्या महाराष्ट्रभर पसरला आहे. महाराष्ट्रातील मुस्लिम महिलाही हिजाबवरून चांगल्याचा आक्रमक झाल्या आहेत. आज पुण्यात आणि मालेगावातही पोलिसांचा विरोध झुगारून आंदोलनं आणि मेळावे भरवण्यात आले. कर्नाटकाल्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर सुरूवातील धुमाकूळ घातला.
सुरूवातील कर्नाटकात सुरू झालेल्या हिजाबचा (Hijab) वाद सध्या महाराष्ट्रभर पसरला आहे. महाराष्ट्रातील मुस्लिम महिलाही हिजाबवरून चांगल्याचा आक्रमक झाल्या आहेत. आज पुण्यात आणि मालेगावातही पोलिसांचा विरोध झुगारून आंदोलनं आणि मेळावे भरवण्यात आले. कर्नाटकाल्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर सुरूवातील धुमाकूळ घातला. एका बाजून जय श्री राम (Jai shri Ram) तर दुसऱ्या बाजूने अल्ला…या वादाने राजकारणही ढवळून निघाले आहे. देशभरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणी याला दडपशाहीचं नाव देतंय तर कोणी धर्माचं. मालेगावात हिजाबसाठी हजारो मुस्लिम महिला एकवटल्याचे पहायला मिळाले. पोलिसांचा विरोध झुगारून कल्लू स्टेडियम वर हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती दिसून आली. कर्नाटकातील (Karnataka Hijab Dispute) आंदोलन घोषणा देणाऱ्या त्या तरूणीचा उल्लेखही यावेळी करण्यात आला.
मालेगावात मुस्लिम महिलांचे आंदोलन, नगरमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन
हे आंदोलन करताना या महिलांच्या हातातील फलकांनीही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण हे फलक उर्दूत होते. महिलेच्या चरणी जन्नत आहे म्हणत, महिलांना संस्कृती जोपासनेची जबाबदारी दिली गेली. पडदा सुरक्षित जीवनासाठी लाख मोलाचा आहे, असे मत यावेळी या महिलांनी व्यक्त केले आहे. शरीर पूर्ण झाकणे हेच महत्वाचे असल्याचेही या महिलांनी ठासून सांगितलं आहे. अहमदनगरला हिजाब प्रकरणी राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आलाय. तर दुसरीकडे नगरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत हिजाबला विरोध करणाऱ्यांचा निषेध केला आहे. हिजाब हे मुस्लीम धर्मशास्त्राप्रमाणे मुली आणि महिलांना अत्यावश्यक असून मुस्लिम विद्यार्थिनी हिजाबच्या आणि बुरख्याच्या आत शाळेचा गणवेश घालतात. त्यामुळे हिजबाला विरोध करणे चुकीचे असल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे. यावेळी मोर्चेकऱ्यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केलीये.
पुणे, सोलापुरातही राजकीय पक्षांची आंदोलनं
याचे पडसाद सोलापुरात उमटत आहेत. आज दुसऱ्या दिवशीही हिजाब बंदीविरोधात राजकीय पक्षानी आंदोलन केलंय. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने कामगार नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हिजाबच्या नावे मुस्लिम विद्यार्थिनींवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा जळजळीत निषेध करण्यात आला. पुण्यातही कर्नाटकमध्ये मुस्लिम समुदायाच्या मुलींना हिजाब वापरण्यास बंदी घालनाऱ्या कर्नाटक भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन केलं. गंज पेठेतील फुले वाड्यात हे आंदोलन करण्यात आलं. मुस्लिम महिलांसह इतरही महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे राज्यभर आजही या हिजाब प्रकरणाचे पडसाद उमटल्याचे दिसून आले.