कोरोना योद्ध्यांनी रस्त्यावरच थाटलं बिऱ्हाड! कुटुंब-कबिल्यासह आंदोलन सुरु

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आता कडाकाच्या थंडीत रस्त्यावरच बिऱ्हाड थाटण्याची वेळ आली आहे. चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचारी गेल्या 7 महिन्यांपासून वेतनाच्या प्रतिक्षेत आहेत.

कोरोना योद्ध्यांनी रस्त्यावरच थाटलं बिऱ्हाड! कुटुंब-कबिल्यासह आंदोलन सुरु
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 10:46 PM

चंद्रपूर : कोरोना प्रकोपाच्या काळात ज्या कोरोना योद्ध्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा केली. त्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आता कडाकाच्या थंडीत रस्त्यावरच बिऱ्हाड थाटण्याची वेळ आली आहे. चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचारी गेल्या 7 महिन्यांपासून वेतनाच्या प्रतिक्षेत आहेत. महत्वाची बाब म्हणजे या 500 कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आलं आहे. पण पगारच नसल्यामुळे या कोरोना योद्ध्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.(Agitations of contract health workers in Chandrapur)

पगारासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे सततचा पाठपुरावा करुनही काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच या कोरोना योद्ध्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. आपल्या कुटुंब-कबिल्यासह या कोरोना योद्ध्यांनी रस्त्यावरच कडाक्याच्या थंडीत डेरा टाकला आहे. याठिकाणी जेवण आणि राहण्याच्या सर्व व्यवस्थेसह हे कंत्राटी कर्मचारी आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. जनविकास कामगार संघाचे पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे.

कोरोना योद्धांना 50 टक्के कोटा राखीव ठेवा – भाजप

कोरोना काळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम केले. बऱ्याच डॉक्टर आणि नर्सेसला कोरोनाची लागण झाली. तरीही त्यांनी कर्तव्यात कसुर पडू दिला नाही. कोरोना काळात कोविड हेल्थ सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी 50 % कोटा राखीव ठेवावा, अशी मागणी दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

आमदार राहुल कुल यांनी पत्रात लिहिले आहे की, महाराष्ट्र आणि पर्यायाने संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना शासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने हजारो कंत्राटी कर्मचारी ज्यामध्ये नर्सेस, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका चालक आदींनी जिवाची बाजी लावून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी काम केले. हजारो रुग्णांचे प्राण वाचवले. देश आणि महाराष्ट्राच्या हितासाठी हजारो रुग्णांना सेवा देणाऱ्या या कंत्राटी कामगारांच्या सेवेची दखल घेऊन कोरोना काळात शासकीय रुग्णालये, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये सेवा दिलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने अंशकालीन घोषित करून त्यांना शासकीय आरोग्य सेवेत कायम करणे बाबत सहानुभूतीने विचार करावा.

संबंधित बातम्या :

आजारी पडलेले कोरोना योद्धे रुग्णालयातून परतलेच नाहीत; मोदींना अश्रू अनावर

डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना घर सोडण्यास सांगितल्यास घरमालक, हाऊसिंग सोसायटींवर कारवाई

Agitations of contract health workers in Chandrapur

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.