शेतकऱ्यांनो… 70 ते 100 मीमी पाऊस पडेपर्यंत चाड्यावर मुठ ठेवू नका, कृषीमंत्र्यांचं आवाहन; घरचं बियाणं वापरण्याचाही सल्ला

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना, जो पर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही. तो 70 ते 100 मी मी पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका असेही आवाहन कृषीमंत्री भुसे यांनी केलं आहे.

शेतकऱ्यांनो... 70 ते 100 मीमी पाऊस पडेपर्यंत चाड्यावर मुठ ठेवू नका, कृषीमंत्र्यांचं आवाहन; घरचं बियाणं वापरण्याचाही सल्ला
कृषीमंत्री दादा भुसेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 7:01 PM

मुंबई : कृषी विद्यापीठ (Agriculture University) शेतकरी हितासाठी आहे. तर कृषी विज्ञान केंद्राचंही काम आहे. त्यामुळे शेतकरी (Farmers) हिताच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या केंद्रांनी काम करावं. तर जो पर्यंत शेतीकरण्या योग्य पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका. 70 ते 100 मीमी पाऊस पडेपर्यंत चाड्यावर मुठ ठेवू नका, असे आवाहन राज्यातील शेतकऱ्यांना कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी केलं आहे. तर यंदाच्या उशिरा सुरू होणाऱ्या पावसावर बोलताना त्यांनी, भौतिक बदल झाल्यामुळे पाऊस उशीरा येताना दिसत असल्याचे म्हटलं आहे. यावेळी भुसे यांनी, वेध शाळेच्या अंदाजानूसार 97 ते 103 टक्के पाऊस पडेल असे सांगण्यात येत होते. मात्र भौतिक बदल झाल्यामुळे पाऊस उशीरा येताना दिसत असल्याचे म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना, जो पर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही. तो 70 ते 100 मी मी पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका असेही आवाहन कृषीमंत्री भुसे यांनी केलं आहे.

शेतकरी हिताच्या योजना

त्याचबरोबर गावपातळीवर ज्या समिती स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यांनी शेतकरी हिताच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावं असेही त्यांनी म्हटलं आहे. तर गावच्या परिसरात किती पाऊस पडतो याची चर्चा होतं असते. त्याप्रमाणे होईलच असं नाही. त्यासाठी आधीपासूनच तयार रहायला हवं असेही ते म्हणाले. तर तालुका स्तरावर किती बियाणं, खतं लागणार याचा आढावा आमदार, पालकमंत्री यांच्याकडून घेण्यात आला होता असेही ते म्हणाले. तर याबाबत महसूल विभाग पातळीवर आपण स्वतः आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

घरची बियाणं वापरा

तसेच संपूर्ण राज्यासाठी बियाणं रासायनिक खते याचं प्रत्येक जिल्हानुसार नियोजन करण्यात आलं आहे. तर त्याची कमी पडणार नाही याची तयारी करण्यात आली आहे असेही कृषीमंत्री भुसे यांनी म्हटलं आहे. तर सध्या सोयाबीन आणि कापूस ही दोन महत्वाची पिकं असून त्यासाठी घरची बियाणं वापरावं असेही त्यांनी सांगितलं आहे. तर ही मोहिम आपण राबवत असून 60 टक्के क्षेत्र हे सोयाबीन आणि कापूस या पिकाखाली असल्याचेही कृषीमंत्री भुसे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

1 जुलैपासून कृषी सप्ताह

पुढील तीन वर्षासाठी 1 हजार कोटी रुपयेंची जी घोषणा करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तर क्लस्टर प्रोजेक्ट आपण राबविणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. तसेच 1 जुलैपासून कृषी सप्ताह राबविणार. मागच्या वर्षीच्या तुलनेत दीड टक्के पेरणी ही राज्यात झाली असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. तर विधानपरिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकू असा त्यांनी विश्वास दाखवला आहे. तर कुठलाही घोडेबाजार होणार नाही. तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार असल्याचेही कृषीमंत्री भुसे यांनी सांगितलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.