Kharif Season : खरिपाच्या तोंडावर कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला अन् दिलासाही
यंदा रासायनिक खताचा तुटवडा भासेल अशी अफवा पसरवली जात आहे. जेणेकरुन खताचे दर वाढून मध्यंस्तींना त्याचा फायदा होईल. पण शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. खरिपासाठी राज्याने केंद्राकडे 52 लाख मेट्रीक टन खताची मागणी केली आहे. 45 लाख मेट्रिक टन आवनटन केंद्राने मंजूर केले आहे. दर महिन्याला त्यात्या वेळे प्रमाणे, खत मे जून जुलै या तीन महिन्यात उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही राज्याच्या वतीने करण्यात आली आहे.
नाशिक : सध्या रब्बी हंगाम संपला असून आता खरिपाचे वेध लागले आहे. शेतकऱ्यांपूर्वी प्रशासनालाच योग्य त्या प्रकारची तयारी ही करावीच लागते. सध्या जिल्हा स्तरावरील बैठकात बी-बियाणे, खत आणि यंत्रणा याचा आढावा घेतला जात असला तरी कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. शेतकरी एखादा पाऊस झाला की, चाढ्यावर मूठ ठेवण्याच्या तयारीत असतो. मात्र, पुन्हा पावासाने ओढ दिली तरी दुबार पेरणी ही ठरलेलीच आहे. याचा अनुभव दरवर्षी शेतकऱ्यांना येत असतो. त्यामुळे किमान 100 मिमि पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेऊच नये. शिवाय पेरणीपूर्वी कृषी अधिकाऱ्यांचा एक सल्ला देखील उत्पादन वाढीसाठी महत्वाचा ठरतो. त्यामुळे बी-बियाणे आणि खताची चिंता न करता उत्पादनवाढ करण्याचे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. तर दुसरीकडे खरीप पेरणीपूर्व पीक कर्जाचे वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
52 लाख टन खताची मागणी 45 लाख मेट्रीक टनाला मंजूरी
यंदा रासायनिक खताचा तुटवडा भासेल अशी अफवा पसरवली जात आहे. जेणेकरुन खताचे दर वाढून मध्यंस्तींना त्याचा फायदा होईल. पण शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. खरिपासाठी राज्याने केंद्राकडे 52 लाख मेट्रीक टन खताची मागणी केली आहे. 45 लाख मेट्रिक टन आवनटन केंद्राने मंजूर केले आहे. दर महिन्याला त्यात्या वेळे प्रमाणे, खत मे जून जुलै या तीन महिन्यात उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही राज्याच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खत, बी-बियाणांचा तुटवडा भासू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास कारवाईच
दरवर्षी खरीप हंगामात बी-बियाणे विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक असे प्रकार हे घडतातच. यंदा खताची कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या किंमतीमध्ये खत विकण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली आहे. मात्र, बियाणे खते बाबत शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर दुकानदारसह ज्यांनी खत बनविली त्या कम्पनी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य कृषिमंत्री यांनी दिले आहेत.
वेळेत कर्ज पुरवठा, तरच योजनेचा उद्देश साध्य
खरीप हंगामासाठीचे पीककर्ज वितरणास सुरवात झाली आहे. एप्रिल महिन्यांपासून कृषी योजना राबवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर यंत्रणा अद्यापही हललेली नाही. खरीप हंगामासाठीचे पीक कर्ज वितरणास सुरवात झाली आहे. या कर्जावर खरिपाचा खर्च निघेल .शिवाय शेतकऱ्यांना ऐन गरजेच्या वेळी ही रक्कम पदरी पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ठेवी ज्याप्रमाणे ठेऊन घेतल्या जातात त्याच प्रमाणे कर्जाचेही वितरण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.