अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांत लॉकडाऊन; व्यापाऱ्यांमध्ये संताप, निकष बदलण्याची मागणी

ज्या गावांमध्ये 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना रुग्ण आहेत, अशा गावांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. मात्र, सणासुदीच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केलाय.

अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांत लॉकडाऊन; व्यापाऱ्यांमध्ये संताप, निकष बदलण्याची मागणी
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 1:46 PM

अहमदनगर : तिसऱ्या लाटेचं संकटही अजून कायम आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये आजपासून लॉकडाऊनचे आदेश देण्यात आलेत. या आदेशानुसार मेडिकल आणि दवाखाना वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. आम्ही खायचं काय आणि जगायचं कसं? असा सवाल इथल्या व्यापाऱ्यांनी केला आहे. (Traders oppose lockdown in 61 villages in Ahmednagar district)

जिल्हा प्रशासनाकडून लावण्यात आलेले लॉकडाऊनचे निकष बदलण्याची मागणी व्यापारी करत आहेत. प्रशासनानं लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 61 गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या सर्वाधिक रुग्ण हे संगमनेर तालुक्यात आहेत. ज्या गावांमध्ये 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना रुग्ण आहेत, अशा गावांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. मात्र, सणासुदीच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. दोन वर्षांपासून आधीच लॉकडाऊन असल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या निकषात बदल करण्याची मागणी व्यापारी करत आहेत.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांचा यात समावेश

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24 गावांचा यात समावेश आहे. आजपासून 13 ऑक्टोबरपर्यत हा कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय. यामध्ये संगमनेर तालुक्यातील तब्बल 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश करण्यात आलाय.

61 गावात गावबंदी का?, अजित पवारांनी सांगितलं

अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर आणि पारनेर तालुक्यात परिस्थिती थोडी गंभीर बनायला लागलेली आहे. म्हणून तिथे गमे म्हणून विभागीय आयुक्त आहेत आणि राजेंद्र भोसले म्हणून जिल्हाधिकारी आहेत. अहमदनगरच्या पारनेर तालुक्याला लागून इकडे पुणे जिल्हा सुरु होतो. तर पलिकडे संगमनेरला लागून नाशिक जिल्हा सुरु होतो. ही दोन्ही मोठी शहरं आहेत. एकदा ते कंट्रोलमध्ये नाही आलं आणि वाढलं तर त्याचा खूप मोठा फटका बसू शकतो. ससून रुग्णालयात किती रुग्ण दाखल आहेत, त्यातील 40 टक्के रुग्ण हे नगर जिल्ह्यातील आहेत. म्हणून आम्ही ही गोष्ट गांभीर्यानं घेतली की 40 टक्के रुग्ण एकट्या नगर जिल्ह्यातून आलेत. तिथे नेमकं काय घडलं? तिथे मग संगमनेर तालुका, पारनेर तालुक्यात रुग्ण सापडत आहेत. जिल्हाधिकारी, प्रशासनाचे अधिकारी, स्वत: बाळासाहेब थोरात, आमदार निलेश लंके तिथे जात आहेत, पाहणी करत आहेत. मग त्यानंतर ठरलं की गावबंदी करावी, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं.

इतर बातम्या :

घटस्थापनेपासून साई मंदिर भक्तांसाठी खुले, रोज किती भाविकांना प्रवेश मिळणार?

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, बीडमध्ये आक्रोश परिषदेद्वारे नुकसानाची दाहकता मांडणार: राजू शेट्टी

Traders oppose lockdown in 61 villages in Ahmednagar district

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.