Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; 52 टाके पडल्यामुळे…

सध्या त्या परिसरात वनविभागाचे अधिकारी येऊन गेले आहेत. त्याचबरोबर त्या परिसराची पाहणी करीत आहे. त्याचबरोबर बिबट्याला जेरबंद करण्याचं नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आलं आहे.

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; 52 टाके पडल्यामुळे...
leopard attackImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 9:09 AM

अहमदनगर : कोपरगाव (Kopergaon ) तालुक्यातील धामोरी परिसरात काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी (Leopard Attack on Farmer) गंगाधर ठाकरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या हाताला 52 टाके पडले असल्याची माहिती समजली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धामोरी शिवारात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला आहे. वन विभागाने (Forest Department) याची दखल घेऊन लवकरात लवकर परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेल बंद करावे अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून केली आहे.

ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन केले

धामोरी परिसरात मागच्या अनेक दिवसांपासून बिबट्याचं दर्शन अनेकांना झालं होतं. त्यानंतर अनेकांनी ही गोष्ट वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. पण वनविभागाने शेतकरी आणि ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शेतात अनेक ठिकाणी अडचण असल्यामुळे बिबट्या परिसरात लपून राहत आहे. काल हल्ला झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. हल्ला इतका भयानक होता की, गंगाधर ठाकरे यांच्या हाताला जवळपास 52 टाके पडले.

सध्या त्या परिसरात वनविभागाचे अधिकारी येऊन गेले आहेत. त्याचबरोबर त्या परिसराची पाहणी करीत आहे. त्याचबरोबर बिबट्याला जेरबंद करण्याचं नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

बुलढाणा जिल्ह्यात सुध्दा बिबट्याचा हल्ला

काल बुलढाणा जिल्ह्यात रात्री शेतीला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर सुद्धा बिबट्याने हल्ला केला. गव्हाच्या पीकाला पाणी सोडले असताना, शेतकरी त्यांच्या शेतात उभा होता. त्याचवेळी तिथं बिबट्या आल्याची त्यांना जाणीव झाली, त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर बिथरलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. तिथं लोकांनी धाव घेतल्यानंतर बिबट्या तिथून निघून गेल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.