खेळता खेळता हौदासमोर गेला अन् कुचकामी झाकणामुळे … 4 वर्षांच्या चिमुकल्यासोबत काय घडलं ?
अहमदनगरमधून एक धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. शहहरातील मुकुंदनगर भागातील एका हौदात रडून अवघ्या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्या हौदाचे झाकण कुचकामी होते. खेळता खेळता तो मुलगा हौदाजवळ गेला आणि त्याचा तोल जाऊन तो आतमध्ये पडला.
अहमदनगरमधून एक धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. शहहरातील मुकुंदनगर भागातील एका हौदात रडून अवघ्या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्या हौदाचे झाकण कुचकामी होते. खेळता खेळता तो मुलगा हौदाजवळ गेला आणि त्याचा तोल जाऊन तो आतमध्ये पडला. ही संपूर्ण दुर्दैवी घटना त्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओही समोर आला आहे. आपल्या मुलाच्या अकस्मात मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर चिमुकल्याने जीव गमावल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनसार, रविवारी दुपारी चारच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. शहरातील मुकंदनगर भागातील इस्लामीया बेकरी परिसरात राहणाऱ्या शेख कुटुंबियांचा मुलगा घराबाहेर खेळत होता. खेळता खेळता तो चालत एका किराणा स्टोअर्सच्या समोरच्या हौदात पडला. त्याचे झाकण अत्यंत कुचकामी असल्याने चार वर्षांच्या तो मुलगा खोल हौदात पडला आणि बुडाला. सुमारे चार तास तो चिमुरडा हौदात पडून होता. बचावासाठी त्याने मारलेल्या हाका कोणालाच ऐकू आल्या नाहीत.
थोड्या वेळाने त्याच्या घरचे त्याला शोधू लागले मात्र मुलगा कुठेच सापडेना. अखेर बरीच शोधाशोध केल्यानंतर कोणालातरी तो हौदात पडल्याचे दिसले आणि एकच गोंधळ माजला. नागरिकांनी धाव घेत त्याला लगेच हौदाबाहेर काढले, मात्र दुर्दैवाने तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पाच तास तो त्याच हौदात होता, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
सदर भागातील किराणा दुकानाच्या मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घ़डली आणि एका चिमुकल्याला नाहक जीव गमवावा लागला. यापूर्वी अनेकांनी दुकानदाराला हौदाच्या झाकणाबद्दल तक्रार केली होती, पण त्याने त्याकडे लक्ष दिले नाही आणि हा दुर्दैवी प्रकार घडला.
यामुळे परिसरातील नागरिक अतिशय संतापले असून त्यांनी आक्रमक भूमिका घेत त्या दुकानदारााविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.